Torres Company Fraud : कोट्यवधींचा हिरा दिला; ५०० रुपयांचा निघाला, टोरेसचा झोल Exclusive

Torres Company Fraud update : टोरेस घोटाळा उघडकीस आला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना लाखोंच्या गुंतवणुकीमागे ५०० रुपयांचा हिरा दिला होता. अवघ्या ५०० रुपयांचा हिरा दिल्यानंतर त्यांची पायाखालची जमीन सरकली आहे.
Torres Company scam
scam Saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

मुंबई : मुंबई स्थित टोरेस कंपनीच्या घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबईतील या टोरेस कंपनीने कमी कालाविधित दुप्पट परतावा देण्याचं आमिष दिलं होतं. या घोटाळ्याबाबत आणखी मोठी अपडेट हाती आली आहे. या टोरेस कंपनीचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. या कंपनीत गुंतवणूक केलेल्या एका व्यक्तीला सिक्युरिटीसाठी यांना हिरा दिला होता. या हिऱ्याची किंमत ५०० रुपये इतकीच निघाली आहे. या टोरेस कंपनीच्या गुंतवणूकादारांचे टेन्शन वाढलं आहे.

Torres Company scam
Chhatrapatil Sambhajinagar Scam: कंत्राटी कामगार, पगार १३ हजार; गर्लफ्रेंडला गिफ्ट केला 4 BHK अलिशान फ्लॅट

टोरेस कंपनी ही 12 महिन्यांपासून कंपनी सुरु आहे. या कंपनीने भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. गेल्या महिन्यापर्यंत अनेक नागरिकांना याची परतफेड देण्यात आली होती. या भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी त्यांना डायमंड हिरा देण्यात आलेला होता. परंतु हा डायमंड हिरा देखील खोटा असल्याचे समोर आले आहे. या हिऱ्याची बाजारभाव किंमत 500 रुपये इतकीच आहे. या कंपनीत लोकांनी 10 लाख तसेच जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत गुंतवणूक केली आहे.

Torres Company scam
Mumbai CRZ Scam: जमिनींचे बनावट सरकारी नकाशे, बेकायदा बांधकामं; मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा

या टोरेस कंपनीच्या विविध भागात शाखा आहेत. या टोरेस कंपनीचं भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरातही कार्यालय आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्या आयुष्यभराची कमाईची लूट केली आहे. गुन्हा दाखल होताच या कंपनीच्या प्रमुखांनी पोबारा केल्याची माहिती हाती आली आहे. या कंपनीच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यानंतर फसवणुकीच्या गुंतवणूक योजनांपासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांनी केली आहे.

Torres Company scam
Torres Scam : 2025 चा सर्वात मोठा घोटाळा; टोरेसचा ग्राहकांना ५०० कोटींचा गंडा | Video

मिरा भाईंदर पोलिसांची महत्वाची कामगिरी

टोरेस कंपनीकडून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी मुंबई,नवी मुंबईमधील कार्यालय बंद दिसल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र मुंबईतील माहिती मिळताच मिरा भाईंदर पोलिसांनी सतर्कता दाखवून कंपनीचे खाते गोठवले आहे. त्यामुळे नागरिकांचे १ कोटी ७७ लाख रुपये वाचवण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com