Mumbai Police reunite a distressed aspiring doctor with his family after finding him begging on city streets. saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत भीक मागत फिरणारा ‘भावी डॉक्टर’ पोलिसांमुळे पुन्हा कुटुंबाच्या कुशीत

Aspiring Doctor Found Begging In Mumbai Reunited With Family: मुंबईतील मालाड परिसरात भीक मागताना आढळलेल्या नांदेडच्या वैद्यकीय विद्यार्थ्याला पोलिसांनी संवेदनशीलतेने मदत करून त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आणले.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा नांदेडमधील एक तरुण तब्बल दीड ते दोन महिने मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागत फिरत होता. मात्र मालाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा तरुण पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचला आहे.

नांदेड जिल्ह्यातील तमसा गावचा अभय सुरेश टेकाळेकर हा तरुण होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन शिक्षण सुरू असतानाच काही मानसिक तणावामुळे तो घरातून बाहेर पडला होता.मुंबईतील मालाड एस. व्ही. रोड परिसरात पहाटे बीट मार्शल अमोलकर आणि पोलिस शिपाई गायकवाड यांनी एक तरुण संशयास्पद अवस्थेत भीक मागताना पाहिला. पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधला असता तो मानसिकदृष्ट्या खचलेला असल्याचं लक्षात आलं.

अभयने पोलिसांना सांगितलं की, “मला माझ्या गावी जायचं आहे म्हणून मी तीन दिवस भीक मागत होतो.” त्यानंतर पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत त्याची चौकशी केली आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेतला. तपासादरम्यान पोलिसांना अभयच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात यश आलं. मुलगा सुखरूप असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने मुंबईत दाखल झाले. पोलिस ठाण्यात झालेल्या भेटीत आई-वडिलांनी अभयला मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा क्षण पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आलं.अभयचे वडील शिक्षक असून मोठा भाऊ औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. घरातून बाहेर पडल्यापासून अभय विविध मंदिरं, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि बसस्टॉपवर दिवस काढत होता.

तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही त्याच्याशी संवाद साधला. त्याच्याकडून माहिती घेत कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. कुटुंबीय आल्यानंतर त्यांची भेट घडवून आणली, असे मालाड पोलिसा ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मनिषा काळककर यांनी सांगितले. मालाड पोलिसांच्या संवेदनशील भूमिकेमुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा हा तरुण पुन्हा आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित छत्राखाली परतला आहे. पोलिसांच्या या मानवीय कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Bottle Side Effects: तांब्याच्या बाटलीत या ५ गोष्टी कधीही ठेवू नका; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

2 भावांनी नांगर ओढून जमीन कसली, बैलजोडी नसल्यानं नांगराला जुंपण्याची वेळ

सरकारी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; 4000 EVM मशीन जळून खाक, राजकीय वर्तुळात संशयाचा धूर

Diabetes Risk: पोटावरील चरबीमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT