Manasvi Choudhary
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे मृणाल ठाकूर.
आगामी काळात मृणाल 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. सोशल मीडियावर या प्रमोशनदरम्यानचे फोटो तिने शेअर केले आहेत.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मृणालने खास लूक केला आहे. जो आकर्षक दिसतो आहे.
केशरी रंगाच्या एथनिक लूकवर तिने कपाळावर बिंदी, मोठे कानातले, हातात अंगठी असा लूक केला आहे.
या फोटोमधील तिचा लूक पाहून नेटकरी झाले आहेत. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर मृणालने शेअर केलेल्या या फोटोंना तिने 'Desi Glam' असे कॅप्शन दिलं आहे.
मृणालचे फोटो सध्या चांगलेच धुमाकूळ घालत आहे.