Manasvi Choudhary
उन्हाळ्यात त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा.
केळी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. केळीचे अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र, तुम्ही कधी कच्चा केळीची भाजी खाल्लीये का?
कच्चा केळीची भाजी अत्यंत चवदार आणि पोष्टिक असते. घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने कच्चा केळीची भाजी बनवा.
कच्ची केळी, हळद, मिरची पावडर, आलं- लसूण पेस्ट, तेल, मीठ, कांदा, मेथी दाने, बडीशेप, धणे-जिरा पावडर, चिंच आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका प्लेटमध्ये कच्ची केळी सोलून घ्या. त्यात मीठ, हळद, आलं- लसूण पेस्ट आणि मसाला हे मिश्रण मिक्स करा.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये केळीचे बारीक काप हलकेसे फ्राय करा यामुळे चव येते.
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मेथी दाणे, बडीशेप, कांदा आणि कढीपत्ता याची फोडणी द्या.
संपूर्ण मिश्रण एकत्र करा नंतर त्यात आलं - लसूण पेस्ट आणि बारीक कापलेला टोमॅटो शिजवून घ्या. मिश्रणात धणे- जिरा पावडर, मसाला मिक्स करा आणि त्यावर झाकण ठेवा.
साधारणपणे, १ ते २ मिनिटे भाजी शिजल्यानंतर कच्चा केळीची स्पेशल भाजी तयार होईल.