Mumbai Dam Water Level Status Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये किती टक्के पाणीसाठा?, वाचा आजची ताजी आकडेवारी

Mumbai Rain And Dam Water Level Update: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या सात जलाशयांपैकी ५ जलाशये काठोकाठ भरली असून ओव्हर फ्लो झाली आहेत.

Priya More

Mumbai Dam Water Level Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कारण मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या सात जलाशयांपैकी ५ जलाशये काठोकाठ भरली असून ओव्हर फ्लो झाली आहेत. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९२.५५ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहचेल. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९२ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,३९,६०१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९२.५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,९१,५६५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८२.३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत.

ठाण्यातील शहापूरमध्ये असलेले तानसा धरण २६ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन तलावांपैकी एक तुलसी तलाव २० जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. मध्य वैतरणा धरण ४ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ८६.७० टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९८.४९ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९७.४४ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९०.१८ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT