पराग ढोबळे, नागपुर प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवरील मैत्री आणि ऑनलाईन गेमिंग पार्टनरच्या जाळ्यात अडकणे नागपूरच्या एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला अत्यंत महाग पडले आहे. ठाण्यातील एका नामांकित डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने बनावट नावाने या उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीशी मैत्री करून, तिची २४ तास खोलीत डांबून सुटका केली आणि तिचे हात-पाय बांधून अत्यंत निर्घृणपणे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
४ वर्षांपूर्वी झाली होती ऑनलाईन ओळख
आरोपीने 'आकाश मेहरा' या खोट्या नावाने इन्स्टाग्राम आणि ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पीडित तरुणीशी मैत्री केली होती. तो ठाण्यातील एका श्रीमंत कुटुंबातील असून महाराष्ट्रातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरात तो दोनदा नागपूरला येऊन गेला होता आणि विविध आमिषे दाखवून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला होता.
रविवारी सकाळी ही तरुणी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. आरोपीने तिला दिघोरी भागातील एका खोलीवर नेले. तेथे तिला जीवे मारण्याची धमकी देऊन डांबून ठेवले. तिचे हात-पाय बांधून तिला बेदम मारहाण केली, चाकूने वार केले आणि विकृत लैंगिक अत्याचार केले. तरुणी २० तास उलटूनही घरी न परतल्याने आणि फोन बंद असल्याने तिच्या उच्चपदस्थ वडिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून तरुणीची सिनेस्टाईल सुटका केली आणि आरोपीच्या आवळल्या मुसक्या आवळल्या. सलग दोन दिवस सहन केलेल्या अमानुष यातनांमुळे तरुणी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कोलमडली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली असून, डीएनए (DNA) व इतर डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.