गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची आजपासून मुंबई जोडो यात्रा सुरू होत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आजपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. आज सकाळी १० वाजता मुंबई जोडो यात्रेचा शुभारंभ होणार आहे. मुंबईच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसने मुंबई जोडो यात्रा सुरू केलीय.
कॉंग्रेसची मुंबई जोडो यात्रा
या यात्रेची सुरूवात कुलाबा येथील स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येत आहे. विधानसभेसाठी मुंबईत मोर्चेबांधणीच्या हेतुने ही यात्रा काढण्यात येत (Maharashtra Vidhan Sabha Election) आहे. मुंबईतील मतदारांपर्यंत पोहोचणं, हाच आजच्या यात्रेचा उद्देश आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची मुंबई जोडो यात्रा अतिशय महत्वपूर्ण असल्याचं बोललं जातंय.
ठाकरे गटाचा आज ठाण्यात मेळावा
तर ठाकरे गटाचा आज ठाण्यात मेळावा होणार आहे. आज ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार आहे. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात आयोजित करण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे गटाचा मेळावा होणार (MVA Politics) आहे.
मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष
गडकरी रंगायतन येथे हा मेळावा होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय. नुकतेच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरून परतले (Congress Mumbai Jodo Yatra ) आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचा ठाण्यात आज मोठा मेळावा पार पडत आहे. त्यांनी दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बड्या नेत्यांशी चर्चा केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Thackeray Group Melava In Thane) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.