मुंबईत भर रस्त्यात धारधार शस्त्राने तरुणाची हत्या; मदतीला कुणीचं धावलं नाही, घटना कॅमेऱ्यात कैद
Mumbai Crime Saam tv

Mumbai Crime : मुंबईत भर रस्त्यात धारधार शस्त्राने तरुणाची हत्या; मदतीला कुणीच धावलं नाही, घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai Govandi crime : मुंबईत भर रस्त्यात धारधार शस्त्राने तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाच्या मदतीलाल कुणीच धावलं नाही. ही हत्येची घटना गोवंडीत घडली.
Published on

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या गोवंडीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद सईद पठाण या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

१८ वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने घटनेनंतर पळून गेला आहे. पोलीस त्याच्या शोधावर आहे.

मोहम्मद सईद पठाण हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. त्या हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. सर्व जण एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरु होते.

मुंबईत भर रस्त्यात धारधार शस्त्राने तरुणाची हत्या; मदतीला कुणीचं धावलं नाही, घटना कॅमेऱ्यात कैद
Crime News : मुलीला पळवून नेल्याने बाप संतापला, तरुणाच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओही काढले

नेमकं काय घडलं?

मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी त्याला गाठलं. त्यांनी जुनं भांडण उकरून काढलं. एका मुलाने मोहम्मदच्या पाठीवर वार केला. त्यानंतर दुसऱ्याने कंबरेवर वार केला. या हल्ल्यात मोहम्मद रस्त्यावरच कोसळला. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुंबईत भर रस्त्यात धारधार शस्त्राने तरुणाची हत्या; मदतीला कुणीचं धावलं नाही, घटना कॅमेऱ्यात कैद
Dharashiv Crime : जन्मदात्याला संपवलं, मृतदेह नदीत फेकला, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुलाच्या मुसक्या आवळल्या!

मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस आता मुख्य आरोपीच्या शोधात आहे. ही थरकाप उडवणारी हत्याचे दृष्ये मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेने शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com