Latest Crime News
Latest Crime NewsSaam TV

Crime News : मुलीला पळवून नेल्याने बाप संतापला, तरुणाच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओही काढले

Latest Crime News : मुलीला फूस लावून पळवून नेल्याने बापाला राग अनावर झाला. त्याने आपल्या मित्रांसोबत तरुणाचं घर गाठत त्याच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला.
Published on

मुलीला फूस लावून पळवून नेल्याने बापाला राग अनावर झाला. त्याने आपल्या मित्रांसोबत तरुणाचं घर गाठलं. घरी एकट्या असलेल्या त्याच्या बहिणीला मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही, तर या घटनेचं आरोपींनी मोबाइलमध्ये चित्रिकरणही केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

Latest Crime News
Ahmednagar News : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; नवदाम्पत्य गावाकडं आलं अन् विपरीत घडलं

तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही संतापजनक घटना हरियाणाच्या लुधियाना जिल्ह्यात घडली. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. रविंदर सिंह, विरेंदर सिंह, अमन सिंह आणि संतोष सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियाना जिल्ह्यात राहणाऱ्या आरोपी रविंदर सिंहच्या मुलीचे पीडित तरुणीच्या भावासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण रविंदर सिंह आणि त्याच्या कुटुंबियांना लागली होती. त्याने मुलीला मारहाण करत संबंधित तरुणाला भेटायचे नाही, असा सज्जड दम दिला.

तरीही प्रेमापोटी मुलीने त्याचे काहीच ऐकले नाही. रविंदर सिंहची मुलगी त्या तरुणासोबत पळून गेली. यावरून आरोपीला राग अनावर झाला. गावात आपली बदनामी झाली आता याचा वचपा मी काढणार, असं रविंदर सिंह वारंवार सांगत होता. दरम्यान, तरुणाची बहिण घरात एकटीच असल्याचं आरोपी रविंदर सिंहला कळालं.

त्याने आपल्या नातेवाईकांना घेऊन थेट तरुणाचं घर गाठलं. तिथे असलेल्या तरुणाच्या बहिणीला आरोपींनी मारहाण केली. इतकंच नाही, तर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार देखील केला. संतापजनक बाब म्हणजे, चारही आरोपींनी बलात्कार करतानाचे व्हिडीओ देखील काढले.

या भयानक घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक तणावात गेली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवस तिची वाचा गेली होती. त्यामुळे ती घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगू शकली नाही. दरम्यान, कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचं समोर आलं.

उपचारानंतर आता तरुणी बोलू लागली असून तिने पोलिसांना जाब दिला आहे. रविंदर सिंह आणि त्याच्या भावाने आपल्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलंय. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात येतोय.

Latest Crime News
Yashshri Shinde Case : उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट; यशश्री शिंदेचा मोबाइल पोलिसांना सापडला, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com