Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यात ७२ टक्के पाऊस होऊनही प्रकल्प तहानलेलीच; ३५० पाणी पुरवठा योजनांवर परिणाम

Dharashiv News : यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. राज्यात सर्वदूर हि परिस्थिती असल्याने बहुतांश धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे. आता पर्यंत ७२ टक्के इतका पाऊस झाला
Dharashiv Rain
Dharashiv RainSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात यंदा समाधान कारक पाऊस पडत आहे. दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पावसाची नोंद झाली असुनही प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले नाही. यामुळे निम्मे पावसाळा संपत आला असताना देखील अद्याप अनेक प्रकल्प तहानलेलीच आहेत. परिणामी जिल्ह्यातील सुमारे ३५० पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Dharashiv Rain
Soyabean Crop : ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव कमी होईना; शेतकरी चिंताग्रस्त

यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. राज्यात सर्वदूर हि परिस्थिती असल्याने बहुतांश धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Dharashiv News) धाराशिव जिल्ह्यात देखील चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे. आता पर्यंत ७२ टक्के इतका पाऊस (Rain) झाला आहे. असे असताना देखील धाराशिव जिल्ह्यातील २२६ प्रकल्पापेकी केवळ २८ भरले असुन उर्वरित प्रकल्पात आणखीही वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली येथे २, भुम तालुक्यातील वांगी येथे १ टॅंकरने आजही पाणी पुरवठा केला जात आहे. 

Dharashiv Rain
Ration Shop : मृत व्यक्तींच्या नावाने धान्याची उचल; भंडारा जिल्ह्यातील रेशन दुकानदाराचा प्रताप

२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा 

धाराशिव जिल्ह्यातील एकुण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ७२६.९८३३ इतकी असली तरी सध्या प्रकल्पांमध्ये केवळ १९५.०५८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असुन त्याची टक्केवारी २६.८३ टक्के आहे. त्यामुळे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com