Ration Shop : मृत व्यक्तींच्या नावाने धान्याची उचल; भंडारा जिल्ह्यातील रेशन दुकानदाराचा प्रताप

Bhandara News : भंडारा तालुक्यातील गराडा खुर्द गावात स्वस्त रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तीच्या टाळूवरची लोणी खात असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही
Ration Shop
Ration ShopSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: रेशन दुकानातून नागरिकांना स्वस्तात धान्य वाटप केले जात असते. यात काही रेशन दुकानदार हे काही लाभार्थ्यांचे धान्य घेऊन जात असतात. मात्र गावातील मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल केली जात असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील गराडा खुर्द येथील रेशन दुकानात समोर आला आहे. याबाबत केलेल्या  तक्रारीनंतर पुरवठा विभागाला जाग आली असून यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. 

Ration Shop
Gram Panchayat Scam : चांडोल ग्रामपंचायतीच्या विकास कामात अडीच कोटींचा घोटाळा; राज्य मुख्य सचिवाकडे केली न्यायाची मागणी

भंडारा (Bhandara) तालुक्यातील गराडा खुर्द गावात स्वस्त रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तीच्या टाळूवरची लोणी खात असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण गराडा येथील अनेक नागरीक मृत झाले, त्यांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद झालं. पण तालुका पुरवठा विभागाकडून (Ration Shop) रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिला जातो. इतकंच नाही तर सरपंच यांच्या सासू तिन वर्षापूर्वी मृत झाल्या. पण त्यांच्या नावाचे धान्य रेशन दुकानदार उचल करत होते. जेव्हा सरपंच महिलेने ऑनलाईनमध्ये पाहिल्यावर हा सर्व भोंगळ कारभार समोर आला. आता या संदर्भात आणखी खोलवर गेल्यावर जे गावातील रहिवासी नाही असा लोकांच्या नावाने देखिल रेशन कार्ड बनविण्यात आले. गावातीलच नागरीक अंतोदया योजनेपासून वंचित आहेत; मग बाहेर गावातील नगतिकांचे रेशन कार्ड कसे तयार झाले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Ration Shop
Soyabean Crop : ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव कमी होईना; शेतकरी चिंताग्रस्त

एका रेशन दुकानदार मागिल अनेक वर्षापासून मृत व्यक्तींच्या नावाने धान्य उचल करत आहे. पण पुरवठा विभागाने साधी चौकशी देखील केली नाही. तर आता तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाई करीता जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com