Mumbai Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! सातही धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर, वाचा ताजी आकडेवारी

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. कोणत्या जलाशयामध्ये किती पाणीसाठी याची आकडेवारी वाचा...

Priya More

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसात जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०२,६१९ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,५७,९१९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ७५.७६ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९५.४१ टक्के पाणीसाठा

- भातसा - ८८.८७ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT