Mumbia News: भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला
Dahisar Society Meeting DisputesSaam Tv

Mumbai News: भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला

Dahisar Society Meeting Disputes: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका सोसायटीच्या मासिक बैठकीत वाद झाला. सभासद आणि अध्यक्षांमध्ये हा वाद झाला. हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले.
Published on

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये सोसायटीच्या मिटिंगमध्ये तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान सोसायटीच्या अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला. ही घटना दहिसरमध्ये घडली. या वादामध्ये सभासदाला आपला अंगठा गमवावा लागला. याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंत परिहार याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका सोसायटीच्या मासिक बैठकीत वाद झाला. सभासद आणि अध्यक्षांमध्ये हा वाद झाला. हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. सोसायटीच्या मीटिंगदरम्यान झालेल्या वादात एका सभासदाला आपला अंगठाच गमवावा लागला. अध्यक्षासोबत झालेल्या बाचाबाचीत अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा चावा घेतल्यामुळे त्याचा अंगठा हातापासून वेगळा झाला.

Mumbia News: भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला
Mumbai Water Storage: दिलासादायक! मुंबईला पाणी पुरवठा करणारी चार धरणं ओव्हरफ्लो, पाहा VIDEO

ही गंभीर घटना दहिसर पश्चिमेकडील मात्रेवाडी अमरनाथ अपार्टमेंटमध्ये घडली आहे. सोसायटीचे सदस्य असलेल्या आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की अध्यक्ष नित्यानंद परिहारने आदित्य देसाई यांचा अंगठा चावला आणि तोडला. आदित्य देसाई यांचा अंगठा तुटून जमिनीवर पडला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आदित्य देसाई यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Mumbia News: भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला
Mumbai Rain: ब्रेकिंग! मुंबईत ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा दमदार हजेरी; रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com