Mumbai Rain: ब्रेकिंग! मुंबईत ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा दमदार हजेरी; रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

Mumbai Rain Latest Update: मुंबईमध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरूवात झालीय. रस्त्यावर पाणी साचण्यास सुरूवात झालीय.
मुंबईमध्ये पावसाला सुरूवात
Mumbai RainSaam Tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही मुंबई

मुंबई पश्चिम उपनगरात पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील अर्ध्या तासापासून उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. सांताक्रुज, पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता, परंतु आज अचानक आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे.

मुंबईत पुन्हा पावसाची दमदार हजेरी

शहरात सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात झालीय. जुलै महिन्यात मुंबईसह राज्यभरात पावसाची धुवाधार बॅटिंग झालेली आपण (Mumbai Rain) पाहिली आहे. आता पुन्हा एकदा पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने आज शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

रस्त्यांवर पाणी साचलं

हवामान खात्याने पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला (Mumbai News) आहे. अतिवृष्टीचा इशारा असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. पुणे आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यापूर्वी IMD मुंबईने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला (Rain Latest Update) होता. पुढील तीन ते चार तासांत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मुंबईमध्ये पावसाला सुरूवात
Kolhapur Heavy Rain : मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान, घरांची पडझड; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात

अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ऑगस्टमध्ये, मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के असण्याची शक्यता (Maharashtra Weather Forecast) आहे. पावसाच्या पाण्याने प्रमुख मार्गांवर पाणी साचलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आगामी काळात शहरात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये पावसाला सुरूवात
Wardha Rain: जुलै महिण्यात वर्ध्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस, 267 हेक्टर जमीन गेली खरडून

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com