गिरीश कांबळे| मुंबई, ता. ४ ऑगस्ट २०२४
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदार संघाच्या सिनेट निवडणुकांची तारीख अखेर समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला तर मतमोजणी 25 सप्टेंबरला होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांची नवी तारीख अखेर समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार असून 25 सप्टेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यांपैकी पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर उर्वरित पाच जागा या एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
तत्पुर्वी, याआधी 21 एप्रिल रोजीची तारीख निवडणुकीसाठी देण्यात आली होती. मात्र मतदार नोंदणीच्या यादीवर आक्षेप घेतल्यानंतर हे सगळं प्रकरण न्यायालयात गेले त्यानंतर या निवडणूका रखडल्या होत्या. आता या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून सविस्तर वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून जाहीर केला आहे
सहा ऑगस्टपासून या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. २२ सप्टेंबरला सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल तर २५ सप्टेंबरला मतमोजणीस सुरूवात होईल आणि निकाल जाहीर होईल. दरम्यान, त्याआधी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या किंवा आचारसंहिता लागल्यास या निवडणुका पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.