उत्तर प्रदेशातील लखनऊ आग्रा एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा मोठा अपघात झाला आहे. लखनौहून आग्राच्या दिशेने येत असलेल्या एका हायस्पीड डबल डेकर बसने सैफईजवळ उस्राहर पोलीस स्टेशन परिसरात पुढे जाणाऱ्या कारला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये सहा जण ठार झाले असून बसमधील ३० जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, लखनौहून निघालेली बस दिल्लीकडे चालली होती. बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. आग्रा एक्सप्रेस वेवर उस्राहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या बसने पुढे जाणाऱ्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की समोरील कार उडून खड्ड्यात पडली.
या दुर्घटनेत कारमधील तिघांचा तर बसमधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३० हून अधिक जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील जखमींना सैफई मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, अपघातावेळी बसमधील सर्व प्रवासी हे झोपेत होते. ही धडक इतकी भयंकर होती की बसमधील काही लोक उडून पडले. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाला डोळा लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आधी कार डिव्हाडरला धडकली अन् बसवर येऊन आदळली, ज्यामुळे ही दुर्घटना झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.