Maharashtra Politics: ठाकरे - शिंदेंमध्ये युतीची चर्चा? भेटीमागे मोठ्ठं डील, राऊतांचे आरोप

MNS chief Raj Thackeray meets CM Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. स्वबळाचा नारा देणारे राज ठाकरे नेमके कशासाठी शिंदेंना भेटले? बंद दाराआड काय चर्चा झाली? महायुतीची काही नवी समीकरणं जळणार आहेत का?
ठाकरे - शिंदेंमध्ये युतीची चर्चा? भेटीमागे मोठ्ठं डील, राऊतांचे आरोप
MNS chief Raj Thackeray meets CM ShindeSaam Tv
Published On

आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याचा नारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बंद दाराआडा ही चर्चा झाली. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.

यावेळी ठाकरे शिंदेंमध्ये युतीबाबत चर्चाही झाल्याचं कळंतय. त्यामुळे आगामी काळात मनसे-शिवसेना युतीचं बिगुल वाजण्याचा अंदाज आहे. मात्र या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधत भेट म्हणजे एक मोठं डिल असल्याचं म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की, कितनी बडी डील हो सकती है. यावर माणसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, डील सुचते कारण राऊत ढील.

ठाकरे - शिंदेंमध्ये युतीची चर्चा? भेटीमागे मोठ्ठं डील, राऊतांचे आरोप
Jayant Patil On Sachin Vaze: 100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेचा गंभीर आरोप, जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर मात्र मनसेनं महायुतीसोबत फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं.त्यात नुकत्याच पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. एकीकडे आक्रमक होणारे उद्धव ठाकरे आणि मविआकडून होणारे शाब्दिक हल्ले यातून मार्ग काढायचा झाल्यास महायुतीला आता चौथ्या भिडूची गरज आहे.

राज ठाकरेंच्या रुपानं महायुतीला शहरी पट्ट्यात मनसेचा किमान मतं विभाजनासाठी नक्कीच फायदा करता येऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगतेय. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

ठाकरे - शिंदेंमध्ये युतीची चर्चा? भेटीमागे मोठ्ठं डील, राऊतांचे आरोप
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का, पुण्यातील बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

मात्र सध्या राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहता भेटीमागे राजकीय अर्थच दडल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे महायुतीला टाळी देणार की टाळणार याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com