Jayant Patil On Sachin Vaze: 100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेचा गंभीर आरोप, जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

Sachin Vaze Allegion on Jayant Patil: सचिन वाझेंनी जयंत पाटलांवरही गंभीर आरोप केलेत. त्याला आता जयंत पाटलांनी उत्तर दिलंय.
100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेचा गंभीर आरोप, जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण
Jayant Patil On Sachin VazeSaam Tv
Published On

रुपाली बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

१०० कोटी खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेने अनिल देशमुख माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आता जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यालाच आता जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. सचिन वाझे मला कधीही भेटलेले नाहीत. माझा त्यांचा कधी काही संबंध नाही, असं ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, ''मी बाईट बघितला. तुरुंगात असणारे लोक आता बाईट देत आहेत. त्यांनी तुरुंगातून पत्र पाठवलं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचे तुरुंगातील लोकांशी संपर्क आहे. मी असं मानतो की, गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) माझे हितचिंतक आहेत. तसे काही असेल तर मला कळवतील ते.''

100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेचा गंभीर आरोप, जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का, पुण्यातील बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

पाटील म्हणाले की, ''रात्री झालेला बाईट दिवसभर कसा चालवला जातोय. त्याला प्रसिद्धी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न झाल्याचं दिसत आहे. समोरच्या लोकांकडून आता सगळे प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर साम दाम दंड भेद, अशा सगळ्यांचा वापर केला जातोय. विरोधकांचा बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.''

सचिन वाझेने काय केले आरोप?

तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, त्याचे पुरावे सीबीआयकडे दिल्याचे म्हटलं आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचेही सचिन वाझेने सांगितले. या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे याने म्हटलं आहे. वाझे याच्या आरोपानंतर आज सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलं आहे.

100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेचा गंभीर आरोप, जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण
CM Shinde Meet Sharad Pawar: मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची अर्धा तास बैठक; मराठा आरक्षणाबाबत झाली महत्त्वाची चर्चा

सचिन वाझे याच्या आरोपणावर बोलताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''या राज्यात अनेक जयंत पाटील आहेत, ते नेमके कोणत्या जयंत पाटील विषयी बोलत आहेत. सध्या राज्य सरकारकडे बोलण्यासारखे काहीच नाही आहे, म्हणून वाट्टेल ते आरोप लावले जात आहेत. राज्य सरकारने ने बेरोजगारीवर बोलावं, भ्रष्टाचारावर बोलावं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com