Pune Rain Alert : पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये काठोकाठ भरली; शहरातील ४०० ते ५०० नागरिकांचे स्थलांतर

Pune Dam Water Level Today : पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरली आहे. खडकवासला प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये काठोकाठ भरली; शहरातील ४०० ते ५०० नागरिकांचे स्थलांतर
Pune Dam Water Level TodaySaam TV
Published On

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहत असून शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरली आहे. खडकवासला प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

खबरदारीचा उपाय म्हणून शांती नगर आणि येरवडा ४०० ते ५०० जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुठा नदीच्या जवळ असलेल्या अनेक घरातील नागरिकांचे शनिवारी रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या मदतीने स्थलांतर करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्यामुळे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले.

पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये काठोकाठ भरली; शहरातील ४०० ते ५०० नागरिकांचे स्थलांतर
Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 48 तास तुफान पावसाचे, आज मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुणे जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांनी घाट माथ्यावरील ठिकाणांवर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुण्यातील येरवडा भागात असलेले शंकराचे मंदिर शनिवारी रात्री पाण्याखाली गेलं. हे मंदिर येरवडा परिसरात असलेल्या शांतीनगर भागात आहे.

मंदिर नदीच्या जवळ असल्याने खडकवासला धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे याचा संपूर्ण भाग पाण्याखाली गेला. अग्निशमन दलाने या ठिकाणी खबरदारी म्हणून एक टीम तैनात केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश धरणं हे 90 ते 95 टक्के भरले आहेत. यामुळे अनेक धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग नदी मध्ये सुरू आहे.

पुणे शहरातील विशेषतः सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल, विश्रांतवाडी या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी केलंय. महापालिकेच्या टीम अनेक ठिकाणी तैनात असून नागरिकांनी कुठली ही मदत हवी असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलीय.

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली

मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये ओव्हर प्लो झाली आहेत. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात तब्बल 92.58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, टेमघर धरण 99 टक्के भरलं आहे.

तर खडकवासला 76.37 टक्के, पानशेत 93.67 टक्के आणी वरसगाव 92.14 टक्के इतकं पाणी जमा झालंय. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुठा नदीला आलेल्या पुरात दोन तरुण विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडले होते. डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे राहणाऱ्या अभिषेक घाणेकर आणि आकाश माने या तरुणांचा यात मृत्यू झाला होता.

या दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार, या दोन्ही मृत तरुणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये काठोकाठ भरली; शहरातील ४०० ते ५०० नागरिकांचे स्थलांतर
Weather Alert : आनंदाची बातमी! अल निनोचा प्रभाव संपला, 'या' दोन महिन्यांत मुसळधार पाऊस कोसळणार, वाचा US IMD अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com