Virar Accident : राज्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राईव्ह; मद्यधुंद कारचालकाने चिरडल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू

Virar drunk and Drive Case : राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे सुरुच पाहायला मिळत आहे. विरारमध्ये भरधाव कारने चिरडल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Virar Accident :
Virar Accident : Saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही प्रतिनिधी

पालघर : राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मद्यधुंद तरुण कारचालकाने महिलेला चिरडले होते. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. आता विरारमध्येही ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली. मद्यधुंद कारचालकाने प्राध्यापिका महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात जाणाऱ्या टोयाटो फॉर्च्युनर कारच्या धडकेत प्राध्यपिकेचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही अपघाताची घटना घडली आहे. आत्मजा कासाट असे मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. आत्मजा या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात शिकवायच्या. या अपघात प्रकरणी पोलिसांनी शुभम पाटील या चालकाला अटक केली आहे. या सातत्याने वाढणाऱ्या अपघातांच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे.

Virar Accident :
Kalyan Hoarding News : मोठी बातमी! घाटकोपरनंतर कल्याणमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक वाहने दबली, थरारक VIDEO

नेमकं काय घडलं?

उत्कर्ष महाविद्यालयातील आत्मजा कासाट या गुरुवारी संध्याकाळी विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरून जात होत्या. यावेळी त्यांना पाठीमागून टोयाटो फॉर्च्यूनर कारने धडक दिली. या धडकेत प्राध्यापिका गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर कारचालकाने त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

Virar Accident :
Accident: भरधाव वाहनानं वृद्ध दाम्पत्याला चिरडलं! दोघेही जागीच ठार

या भीषण अपघातानंतर कारमध्ये बसलेले मित्र-मैत्रिणी फरार झाले. तर या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्राध्यापिका आत्मजा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी चालक शुभम पाटील याला अटक केली. शुभम पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरु होती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com