मुंबई/पुणे

Mumbai News : पर्यटकाच्या जेवणात मेलेला उंदीर, खाल्ल्यानंतर तरूण ३ दिवस हॉस्पिटलमध्ये, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Tourist Finds Mouse In Food: युपीचा पर्यटक मुंबईत सिद्धीविनायकाचं दर्शन करण्यासाठी आला होता. त्याला अन्नातून विषबाधा होवून त्याची प्रकृती खालावल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UP Tourist Finds Mouse In Food In Mumbai

युपीचा एक ३५ वर्षीय व्यक्ती (UP Tourist) सिद्धीविनायकाचं दर्शन करण्यासाठी मुंबईत (Mumbai) आला होता. त्याच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जो ऐकून पायाखालची जमिन सरकते. नेमकं त्याच्यासोबत काय घडलं हे आपण सविस्तर जाणून घेवू या. (latest marathi news)

उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथून ३५ वर्षीय व्यक्ती मुंबईत आला होता. त्याला मुंबईतील सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यायचं होतं. येथे आल्यानंतर त्याने भूक लागल्यानंतर त्याने वरळीतील एका हॉटेलमधून त्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर मागवलं होतं. ही घटना ६ जानेवारीला घडली. ६ जानेवारीला रात्री साडेदहा वाजता त्याने जेवण बोलावलं होतं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑर्डर केलेल्या जेवणातून विषबाधा

त्याने हे अन्न खाल्यानंतर त्याला विषबाधा (food poisoning) जाणवू लागली होती. राजीव शुक्ला असं या व्यक्तीचं नाव आहे. तो तीन दिवस रुग्णालयामध्ये अॅडमिट होता. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणातून विषबाधा झाली असल्याचा आरोप त्याने केला आहे. या जेवणात मृत उंदीर आणि किडे सापडले आहेत. यामुळे माझी तब्येत खराब झाली, असा दावा देखील त्याने केलाय. त्याला ९ जानेवारीपर्यंत हा त्रास होत होता. त्याने नागपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केलीय.

जेवणाची तपासणी होणार

जेवणाच्या शुद्धतेची तपासणी (food poisoning) करण्यासाठी आज राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अन्नाचा नमुना पाठवण्यात येणार आहे. वरिष्ठ निरीक्षक महेश ठाकूर म्हणाले, अहवाल आल्यावर आम्ही हॉटेल मालक आणि व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करू. संबंधित हॉटेलचे एरिया मॅनेजर तपासणी निकालाची वाट पाहत आहे. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही.

मुंबईतील धक्कादायक प्रकार

या घटनेमुळं बाहेर जेवण करण्याची भितीच वाटते. तेथील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होतात. ऑनलाईन जेवण मागवावं की नाही यावर देखील आता शंका निर्माण होतेय. अनेकदा आपण डोळेबंद करून बाहेरून जेवण मागवतो. अन् ते आवडीने देखील होतो. पण काय असं जेवण जेवणं सुरक्षित आहे का? बऱ्याचदा हे जेवण खाल्यानंतर आपल्याला त्रास देखील होतो. पण आपण याकडे दुर्लक्ष करतो. मुंबईतील (Mumbai) हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर मात्र काळजी घेण्याची गरज असल्याचं स्पष्ट होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

SCROLL FOR NEXT