Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला करा गोडाचा बेत! १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर, सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

गोडाचा पदार्थ

गुढीपाडव्याला गोडाचे पदार्थ बनवले जातात. तुम्ही घरीच सोपी आणि झटपट होणारी तांदळाची खीर बनवू शकतात.

Kheer Recipe

साहित्य

आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ, दूध, साखर किंवा गूळ, तूप, सुका मेवा, वेलची पूड, ओलं खोबरं

Kheer Recipe

तांदूळ भिजवून घ्या

सर्वात आधी तुम्हाला आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ धुवून भिजवायचे आहेत. त्यानंतर हे तांदूळ हलकेसे वाटून घ्या.

Kheer Recipe

तांदूळ पूर्ण बारीक करु नका

तांदूळ पूर्णपणे बारीक करु नका. तुम्ही या तांदळाची भरड काढून ठेवा.

Kheer Recipe

दूध उकळून घ्या

एका बाजूला पातेल्यात दूध उकळायला ठेवा.

Kheer Recipe

तांदळाची भरड

यानंतर उकळलेल्या दुधात तांदळाची भरड टाका. हे तांदूळ सतत हलवत राहा जेणेकरुन हे गोळा होणार नाही.

Tandalachi Kheer Recipe | yandex

साखर

यानंतर तांदूळ शिजल्यावर त्यात साखर किंवा गूळ टाका. साखर चांगली विरघळू द्या.

Kheer Recipe

सुकामेवा

यामध्ये सुकामेवा, केशर, वेलची पूड टाका. यात तुम्ही ओलं खोबरेदेखील टाकू शकतात.

Kheer Recipe

खीर शिजवून घ्या

यानंतर खीर मंद आचेवर शिजवून घ्या. खीर जेव्हा दाटसर होईल तोपर्यंत उकळून घ्या.

Kheer Recipe

Next: तांदूळ अन् उकडलेले बटाटे; १० मिनिटांत बनवा 'ही' कुरकुरीत रेसिपी, संध्याकाळी होईल पोटभर नाश्ता

Breakfast Recipe | saam tv
येथे क्लिक करा