महाबळेश्वर येथे ऑनलाइन हॉटेल बुकिंग करणे एका उच्चशिक्षित तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. सायबर चोरट्यांनी परस्पर तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाघोली येथील उच्चशिक्षित तरुणीला ख्रिसमसनिमित्त महाबळेश्वरला जायचं होतं. त्यासाठी महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी तिला हॉटेलची गरज होती. त्यामुळे तिने ऑनलाईन माहिती घेत द कीज हॉटेलमध्ये रूम घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत हॉटेलचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर क्राईम अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून लोणीकंद पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवीन मुंबईत एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने प्रहार केला. नंतर त्याचं फुटलेल्या काचेच्या बाटलीने तिच्यावर सपासप वार केले. ज्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनांतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इमाम हसन शमशुद्दीन, असं या हल्लेखोरचं नाव आहे. या 21 वर्षीय पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.