BMC News 
मुंबई/पुणे

Mumbai BMC News: वेसावेतील सागरी किनारा क्षेत्रात अनधिकृत बांधकाम; दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांचं निलंबन

BMC News: वेसावे परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांची लेखी मंजुरी प्राप्त करण्यात आली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील के पश्चिम विभाग अंतर्गत वेसावे (वर्सोवा) येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणे, वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही त्यांचे निष्कासन न करणे, कामकाजातील इतर नियमित बाबींमध्ये देखील निष्काळजीपणा केल्याप्रकरणी के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.

तर पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची देखील बदली करण्यात आलीय. महानगरपालिका आयुक्तांच्या समक्ष बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना दिल्यानंतरही गैरहजर राहून निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल सोमेश शिंदे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलीय.

प्रशासकीय कामकाज आणि जबाबदाऱ्या यामध्ये कोणीही बेजबाबदारपणा, दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा करू नये, अन्यथा त्यांना देखील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराच या प्रकरणातून महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलाय. दरम्यान, वेसावेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीने विशेष पथकाची नेमणूक देखील करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण

के पश्चिम विभागात २०२२ पासून कार्यरत असलेले दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५९,६० आणि ६३ यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ५९ आणि ६३ यामध्ये अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मुक्या जमिनीवरील बांधकामे, वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात व दलदलीच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या.

सह आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या. सोमेश यांना प्रत्यक्ष बोलावून संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे देखील निर्देश देण्यात आले.

वेसावे भागातील अधिकृत बांधकामांविषयी महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन निष्कासनाची कारवाई दिनांक ३ जून २०२४ रोजी नियोजित होती. त्याबाबत निर्देश मिळाल्यानंतरही सोमेश शिंदे यांनी निष्कासनासाठी कोणतीही तयारी केली नाही. दिनांक ३ जून आणि ४ जून २०२४ रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली.

सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त व इतर सहकारी प्रत्यक्ष घटनास्थळी भर उन्हात उभे राहून दिवसभर कारवाई करीत असताना सोमेश शिंदे हे खासगी वाहनात वातानुकुलन यंत्रणा सुरू करून चक्क बसून राहिले. कारवाई पूर्ण होण्याआधीच ते निघून गेले. विशेष म्हणजे, ही निष्कासन कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

दिनांक ५ जून २०२४ रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी हे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी सोमेश शिंदे आणि स्वप्निल कोळेकर यांना के पूर्व विभाग कार्यालयात बैठकीसाठी बोलावले होते. तथापि सोमेश शिंदे या बैठकीस गैरहजर राहिले आणि महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे त्यांनी उल्लंघन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT