Mumbai News : मुंबई महापालिकेत आणखी एक मोठा घोटाळा? माजी विरोधी पक्षनेत्याचं बीएमसी आयुक्तांना पत्र

कोट्यावधी रूपये या फंडात जमा होतात आणि गरीब रूग्णांना यातून मदत केली जाते.
BMC
BMCSaam TV
Published On

>> निवृत्ती बाबर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात PBCF (Poor Box Charitable Fund) गरीब रुग्ण सहाय्यता निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. याविषयी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहलं आहे.

कोट्यावधी रूपये या फंडात जमा होतात आणि गरीब रूग्णांना यातून मदत केली जाते. 2017 पासूनच्या जुन्या केसेसमध्ये खोटी कागदपत्रे तयार करून या निधीवर डल्ला मारला गेलाय. यासाठी डिन, डेप्युटी डिन, एएमओ आणि युनिट हेड यांच्या बोगस सह्या आणि बोगस स्टॅम्प तयार करण्यात आले. (Latest Marathi News)

BMC
Eknath Shinde : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांना कसं पटवून दिलं? CM शिंदे म्हणाले...

केवळ एका नोंद वहीत 65 लाखांचा भ्रष्टाचार उघड झालाय. ऊर्वरीत नोंदवहीतील व्यवहारांची कसून चौकशी केल्यास आणखी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर येऊ शकतो. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाली गायकवाड यांना अटकही झाली होती.

BMC
BBC Documentary In TISS : 200 विद्यार्थ्यांनी वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्री पाहिली; 'पीएसएफ' विद्यार्थी संघटनेने केला दावा

परंतु त्यांना वाचवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून होत आहेत. केवळ एक कर्मचारी हा भ्रष्टाचार करू शकणार नाही, तर यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा गुंतले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com