Eknath Shinde : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांना कसं पटवून दिलं? CM शिंदे म्हणाले...

अडचणीवर मात करून आज एक मोठा प्रकल्प उभा राहिला, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे .
Eknath shinde
Eknath shinde saam tv
Published On

Eknath Shinde News : समृद्धी महामार्ग प्रकल्पाने सर्वांना भरूभरून दिलं आहे. या प्रकप्लात अनेक अडचणी आणल्या. मात्र, अडचणीवर मात करून आज एक मोठा प्रकल्प उभा राहिला, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे . (Latest Marathi News)

Eknath shinde
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मोठं विधान; म्हणाले...

मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पातील जमीन भूसंपादनाविषयी भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, 'समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत लोकांना खूप समजावलं. तुम्ही जमीन समृद्धी महामार्ग प्रकल्पाला दिली तर दुसरीकडे जमीनही घेऊ शकता. घर देखील बांधू शकता. तर छोटा-मोठा व्यवसाय देखील करू शकता, अशा प्रकारे पटवून दिलं. हा फक्त हायवे नाही. तर हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे. राज्याची अर्थव्यवस्था बदणारा ७०१ किलोमीटरचा महामार्ग आहे'.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्गाची मांडणी झाली. त्यावेळी MSRDC चा मंत्री होतो. त्यावेळी माझ्य विभागाच्या खात्यावर साडेसहा हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्यावेळी समृद्धी महामार्ग प्रकल्पाचं काम माझ्याकडे सोपावलं गेलं. त्यावेळी त्या कामात अनेकांनी विरोध केला. मात्र मी लोकांचं समुपदेशन केलं,आरटीजीएसने तीन तासांत लोकांचे पैसे दिले'.

Eknath shinde
Sharad Pawar News : साहेबांसाठी काय पण! शरद पवार मुलीच्या लग्नाला येणार म्हणून कार्यकर्त्याने दिला परंपरेला छेद

'गुत्तेदार लोकांना एक-दीड हजार शेततळे बांधण्यास लावले. त्यासाठी कुठेच बळजबरी केली नाही. मी स्वत: गावात लोकांना जाऊन प्रकल्प समजून सांगितला. त्यामुळे भूसंपादन होऊ शकलं, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com