Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबई हादरली! बाथरूमध्ये आढळला डॉक्टरचा मृतदेह, सायन रुग्णालयालयात नेमकं काय घडलं?

Mumbai Doctor End Life: मुंबईतील सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. वसतीगृहातील बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली.

Priya More
  • मुंबईतील सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरचा मृत्यू

  • शिवचरण आप्पा पाटील यांनी केली आत्महत्या

  • वसतिगृहातील बाथरूममध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळले

  • निवासी डॉक्टरच्या मृत्यूचा मुंबई पोलिसांकडून तपास

  • ॲनास्थेशिया औषधाच्या अतिसेवनाचा संशय

मुंबईमध्ये डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. मुंबईतील सायन रुग्णालयात एका निवासी डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. रुग्णालयातील वसतीगृहात ते राहत होते. वसतीगृहाच्या खोलीमध्ये शनिवारी रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. औषधांचा ओव्हर डोस घेत त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयातील निवासी डॅाक्टर शिवचरण आप्पा पाटील यांनी आत्महत्या केली. ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वसतीगृहातील ते राहत असलेल्या खोलीच्या बाथरूममध्ये शनिवारी रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. शिवचरण पाटील हे सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत होते. या घटनेमुळे सायन रुग्णालयात खळबळ उडाली.

पोलिसांनी सांगितले की, शनिवारी डॉक्टर शिवचरण रुग्णालयात कामाला आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या खोलीमध्ये राहणाऱ्या मित्राला ते खोलीमध्ये आहेत की नाही हे पाहण्यास वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मित्र खोलीमध्ये आला त्याने खोलीत पाहिले तर शिवरचरण खोलीत नव्हते. त्यामुळे त्याने त्यांच्या मोबाइलवर कॉल केला. तर शिवचरण यांचा फोन बाथरुममध्ये वाजत होता. त्यामुळे त्यांच्या मित्र बाथरूमच्या दिशेने गेला. बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता.

शिचरण यांच्या मित्राने तात्काळ रुग्णालयातील इतर सहकाऱ्यांना आणि पोलिसांना सांगितले. त्यांनी तात्काळ शिवचरण यांच्या खोलीकडे धाव घेतली. पोलिसांनी शिवचरण यांच्या बाथरुमचा दरवाजा तोडला. आतमधील दृश्य पाहून सर्वजण घाबरले. शिवचरण मृतावस्थेत आढळून आले. घटनास्थळी दोन सलाईन आणि कमोडमध्ये ॲनास्थेशिया औषधाच्या दोन बाटल्या आढळून आल्या. शिवचरण यांनी औषधाचा ओव्हरडोस घेत आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. तसंच त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिस सध्या शिवचरण यांनी आत्महत्या का केली याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या 7 गोष्टी लक्षात ठेवा; तुमच्यावर कधीही वाईट वेळ येणार नाही

PANEER VS SOYA CHUNKS : शाकाहारी आहारासाठी प्रोटीनचा कोणता स्रोत आहे अधिक चांगला?

Sleep Talking : झोपेत बडबड करताय? 'या' भयानक आजाराची तर ही सुरुवात नाही ना? आधीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT