

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्चावरून चर्चा
पालिका महापौरांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी २५ लाखांचा खर्च करणार
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा सोशल मीडिया प्रस्ताव
महापौरांच्या सोशल मीडिया खर्चावर शिंदेसेनेची भूमिका केली स्पष्ट
मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिका तब्बल २५ लाख १२ हजार ७८६ रुपये खर्च करणार आहे. महापौर कार्यालयाचे समाजमाध्यम हाताळण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या या प्रस्तावाला १५ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेविना मंजुरी देण्यात आली.
महापौरांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी यापूर्वी २० ऑगस्ट रोजी स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, प्रसिद्धीसाठी होणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरून त्यावेळी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती. त्यानंतर प्रशासनाने नव्याने प्रस्ताव सादर केला आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
या प्रस्तावानुसार, १ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या एक वर्षाच्या कालावधीत महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एकूण २५ लाख १२ हजार ७८६ रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी मे. रनटाइम सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.
महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी होणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव यापूर्वी मंजूर न झाल्यानंतर नव्याने सादर करण्यात आला आणि त्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता महापौर कार्यालयाच्या समाजमाध्यमांच्या व्यवस्थापनावर वर्षभरात २५ लाखांहून अधिक रुपयांचा खर्च होणार आहे.
दरम्यान, महापौरांच सोशल मीडिया प्रस्ताव प्रकरणावरून सत्ताधारी शिवसेना आयुक्तांना पत्र लिहिणार आहे. या प्रस्तावाचा फेरविचार व्हावा अशी पत्रातून मागणी करण्यात येणार आहे. शिवसेना पैशाचा अपव्यय करण्याच्या विरोधात असल्याचा गटनेते अमेय घोले यांचा दावा आहे. तर भाजपा शिवसेनेशी संवाद साधणार असल्याचा सभागृह नेते, भाजप नगरसेवक गणेश खणकर यांचं म्हणणं आहे. तसेच याबाबत महापौरांशी देखील बोलणार असल्याचं खणकर यांनी सांगितले. या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध होता तर त्यांनी सभागृहात चर्चा का केली नाही? असा सवाल खणकर यांनी शिवसेनेला केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.