Mumbai News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! विद्याविहार उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

Mumbai Vidyavihar Railway Flyover News : मुंबईतील विद्याविहार उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. ६५० मीटर लांबीचा हा पूल १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होण्याची शक्यता असून, जाणून घ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि ताजे अपडेट.
Vidyavihar Railway Flyover News
Vidyavihar Railway Flyover News AI Image
Published On: 
Summary
  • विद्याविहार उड्डाणपुलाचे बहुतांश बांधकाम पूर्ण

  • पुलामध्ये रेल्वे रुळांवरील सुमारे १०० मीटर लांबीचा भाग आणि दोन्ही बाजूंना जोडरस्त्यांचा समावेश

  • पादचारी मार्ग, जिने आणि स्थानक परिसरातील सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, हा पूल १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे रेल्वे रुळांमुळे निर्माण होणारा पूर्व-पश्चिम प्रवासातील अडथळा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्याविहार उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये काय?

विद्याविहार येथील हा उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्गाला पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडणार आहे. सुमारे ६५० मीटर लांबीच्या या दुपदरी पुलामुळे वाहनचालकांना रेल्वे रुळांच्या पलीकडे जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होईल. या प्रकल्पात रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या सुमारे १०० मीटर लांबीच्या पुलाचा समावेश आहे. याशिवाय पूर्वेकडील बाजूला २२० मीटर आणि पश्चिमेकडील बाजूला ३३० मीटर लांबीचे जोडरस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवरील वाहतूक एकमेकांशी थेट जोडली जाणार आहे.

Vidyavihar Railway Flyover News
Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई महापालिकेच्या वतीने या पुलाचे प्रमुख बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. पुलावरील रंगकाम, लाइटिंग, रस्त्यांची कामे आणि इतर महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या भिंतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. पुलाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या आवाजाचा त्रास कमी व्हावा, यासाठी या भिंती महत्त्वाच्या ठरणार आहेत. या प्रकल्पात विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पादचारी मार्गांनाही जोडणी देण्यात आली आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या तिकीट खिडक्यांचा परिसर, स्टेशन मास्तरांचे कार्यालय आणि जिने पुन्हा बांधण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील पादचारी मार्गाला जिन्याच्या माध्यमातून रस्त्याशी जोडण्यात आले आहे.

Vidyavihar Railway Flyover News
Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल सुरू झाल्यानंतर वाहनांची ये-जा सुरळीत आणि सुरक्षित राहावी, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. पुलाच्या परिसरात दिशादर्शक फलक आणि आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळेत जोडरस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com