Mumbai Water Cut  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज आणि उद्या ५ ते १० टक्के पाणीकपात, नेमकं कारण काय?

Priya More

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी आज आणि उद्या पाण्याचा जपून वापर करावा कारण मुंबईमध्ये पालिकेकडून ५ ते १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला असून धरणं देखील १०० टक्के भरली होती. पण असे असताना देखील मुंबईत पाणीकपात करण्यात आली आहे. यामागचे नेमकं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत...

मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा जलवाहिनीच्या ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्याने मुंबईमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. १७ ते १८ ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण मुंबईत ५ ते १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवस मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आले आहेत.

वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी येथे ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्याच कारणास्तव जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ ते १० टक्के घट झाली आहे. याचाच परिणाम म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये आज आणि उद्या ५ ते १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला.

मुंबई शहर आणि उपनगराला वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणाऱ्या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये बिघाड झाला असून हे दुरुस्‍ती काम करण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम ४८ तास चालणार आहे. त्यामुळेच धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : प्रेम, प्रणयाला नवे रंग फुटणार; दिवस आनंदी राहणार; वाचा आजचे राशीभविष्य

Varun Sardesai : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी? वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित, VIDEO

Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

Maharashtra News Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Meeting Inside Story : उद्धव ठाकरे अनुपस्थित, आदेश निघाला; मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT