सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये कारकून या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० जणांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये समोर आला आहे. यात संबंधिताने तब्बल १ कोटी ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघरमध्ये हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पंडित पोवार याच्यासह इतर ५ जणांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित पोवार याने आपली रेल्वे प्रशासनात ओळख असल्याचे सांगत कारकून या पदावर नोकरी लावून देणार असे (Fraud) आमिष दिले. अशा प्रकारे त्याने २० जणांकडून तब्बल १ कोटी ३१ हजार रुपये घेतले. मात्र संबंधितांना नोकरी लावून न दिल्याने हा प्रकार समोर आला. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता.
पैसे घेऊन कोल्हापुरात बांधले आलिशान घर
महत्वाचे म्हणजे या फसवणूकतून मिळालेल्या पैशातून पंडित पोवार याने आपल्या कोल्हापूर येथील गावी आलिशान घराचे बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. मागील दोन वर्षांपासून हा फसवणूकीचा प्रकार सुरु असून पैसे परत न केल्याने फिर्यादी यांनी अखेर खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खारघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.