MHADA Lottery 2024 Saam Digital
मुंबई/पुणे

MHADA Lottery Video: हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाच्या 2000 घरांची लॉटरी लवकरच; घरांचे लोकेशन आणि किंमत काय?

MHADA Lottery 2024 Details: खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणार आहेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Priya More

मुंबईमध्ये आपले हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. आता त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे कारण म्हाडा (MHADA Lottery 2024) मुंबईत २००० घरांची सोडत काढणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडा घरांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणार आहेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाच्या घरांची सोडत जारी केली जाणार आहे. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्याभरात म्हाडा सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाची ही घरं सर्व उत्पन्न गटासाठी असणार आहे.

कोपरी पवई येथे मध्यम गटासाठी ३३३ घरं असून याची किंमत १ कोटी २५ लाख रुपये आहे. कोपरी पवई येथे उच्च गटासाठी ९३ घरं असून त्याची किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये मध्यम गटासाठी ८६ घरं असणार असून त्याची किंमत ७० ते ७२ लाख रुपये असणार आहे. कन्नमवारनगरमध्ये अल्प गटासाठी ८६ घरं असून त्याची किंमत ४० लाख रुपये असणार आहे. कन्नमवारनगरमध्ये अल्प गटासाठी ८८ घरं असणार असून त्याची किंमत ५० लाख रुपये असणार आहे.

गोरेगाव पहाडीमध्ये मध्यम गटासाठी १०५ घरं असणार असून त्याची किंमत १ कोटी ७ लाख ५ हजार रुपये असणार आहे. गोरेगाव पहाडी उच्च गटासाठी २२७ घरं असणार असून त्याची किंमत १ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये असणार आहे. खडकपाडा भागामध्ये अल्प गटासाठी ८७ घरं असणार असून त्याची किंमत ६४ लाख १२ हजार ५८४ रुपये असणार आहे. खडकपाडा भागामध्ये अल्प गटासाठी ४६ घरं असणार असून त्याची किंमत ८६ लाख ११ हजार ९२३ रुपये असणार आहे.

मालाड शिवधान येथे अल्प गटासाठी ४५ घरं असणार असून त्याची किंमत ५४ लाख ९१ हजार रुपये असणार आहे. मालाड शिवधान येथे अल्प गटासाठी २० घरं असणार असून त्याची किंमत ७२ लाख रुपये असणार आहे. मालाड शिवधान येथे अल्प गटासाठी २३ घरं असणार असून त्याची किंमत ७३ लाख २२ हजार रुपये असणार आहे. मालाड शिवधान येथे मध्यम गटासाठी १ घर असणार असून त्याची किंमत ९० लाख ७४ हजार रुपये असणार आहे. गोरेगाव पीएमएवाय येथे अत्यल्प गटासाठी ८८ घरं असणार असून त्याची किंमत ३३ लाख २ हजार रुपये असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! ४५ वर्षांच्या व्यक्तीने केलं ६ वर्षीय मुलीशी लग्न, कुठे घडली घटना?

Relationship vs Friendship : रिलेशनशिप की फ्रेंडशिप कशात असतो जास्त फायदा?

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT