ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उडीद डाळ खूप फायदेशीर असते. लोक ती डाळीच्या स्वरूपात खातात आणि उडीद डाळीची खिचडी देखील खूप लोकप्रिय आहे.
या डाळीच्या पदार्थात प्रथिने, फायबर आणि लोह, मॅग्नेशियम व कॅल्शियम यांसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
अनेक लोकांना उडीद डाळीची खिचडी खूप आवडते. कधीकधी खिचडी चिकट आणि लगदासारखी होते. ती एकदम मोकळी बनवण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
उडीद डाळ, तांदूळ, मीठ, तूप, कांदा, टॉमेटो, गरम मसाले, कढिपत्ता, कोथिंबीर हळद आणि हिंग इ. साहित्य लागते.
सर्वात आधी डाळ साफ करुन घेणे. नंतर यात तुम्हाला हवे तितके तांदुळ मिक्स करा. मग दोन्ही गोष्टी ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
कांदा आणि टॉमेटो बारिक कापून घेणे. गरम मसाले तयार ठेवणे. तडक्यासाठी जीरे आणि कढिपत्ता ४ ते ५ पाकळ्या घेणे.
आता कुकर मध्ये तूप टाका आणि त्यावर जीरे आणि कढिपत्ता टाकून कांदा आणि टॉमेटो टाका. नंतर हळद, हिंग आणि सगळे गरम मसाले टाका. त्यावर डाळ आणि तांदूळ टाका आणि नीट मिक्स करुन घ्या.
तयार केलेल्या खिचडीत तुमच्या अंदाजानुसार, पाणी टाका. पाणी थोडे जास्त टाकावे पाण्यामुळे डाळ लवकर शिजण्यास मदत होते. नंतर खिचडीमध्ये चवीनुसार मीठ टाका. मीठ कमी पडले तरी चालेल पण जास्त टाकू नये.
आता कुकरचे झाकण लावून २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. दाब कमी झाल्यावर झाकण उघडून बघा.
झाकण उघडल्यानंतर खिचडी डिशमध्ये काढून घ्या आणि त्यावर कोथिंबीर टाकून सजवा. पापड, लोणचे किंवा चटणी सोबत खिचडी सर्व्ह करा.