ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खिचडी हा हलका, पचायला सोपा आणि आरोग्यासाठी उत्तम पदार्थ आहे. आजारी असताना किंवा जेवण बनवण्यास कंटाळा आलयं तेव्हा खिचडी बेस्ट पर्याय आहे.
तांदूळ, डाळ (मुग,तूर) ,हळद , मीठ चवीनुसार, तूप, जिरे ,कांदा,कढिपत्ता, लसूण, हिंग, पाणी आणि हवे असल्यास भाज्या टाकणे ( गाजर, वाटाणे, बटाटा)
तांदूळ आणि डाळ एकत्र 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. नंतर तांदूळ आणि डाळ 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवा. भिजत ठेवल्यास खिचडी मऊ शिजते.
कुकरमध्ये तूप गरम करा. त्यात जिरे टाकून तडतडू द्या. मग लसूण आणि कढिपत्ता टाकून एक हिरवी मिरची टाका. त्यानंतर कांदा टाकून त्यात हळद आणि हिंग टाकून परतवून घ्या.
धुतलेले तांदूळ आणि डाळ तयार केलेल्या फोडणीत मिक्स करा. त्यानंतर सर्व साहित्य नीट मिक्स करुन घ्या.
खिचडीत 4 कप पाणी घाला. खिचडीचा घट्टपणा हवा असल्यास पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता.
कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या द्या. गॅस बंद करून दाब उतरू द्या.
गरमागरम खिचडीवर तूप आणि कोथिंबीर घालून दही, लोणचं पापड किंवा तूप-तिखटासोबत सर्व्ह करा.