ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोथिंबीर थेपला हि एक गुजराती डिश आहे. हा पदार्थ पोष्टिक असून चवदार आणि पटकन तयार होणारा आहे. नाश्ता जेवण आणि डब्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
कोथिंबीर मोठी जूडी, गव्हाचे पीठ, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, जिरेपूड, लाल तिखट, मीठ, तेल आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी इ. साहित्य लागते.
एक मोठी कोथिंबीर जुडी घ्या. ती स्वच्छ निवडूण घ्या. कोथिंबीर देठासकट घ्यावी. धुतल्यानंतर ती बारिक चिरुन घ्या.
एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात सर्व मसाले, मीठ आणि चिरलेली बारिक कोथिंबीर घाला. थोडे तेल टाकून सर्व साहित्य नीट मिक्स करुन घ्या.
थोडे थोडे पाणी घालत मऊसर पीठ मळायला सुरुवात करा. पीठ फार घट्ट किंवा फार सैल नसावे मध्यम ठेवण्याचा प्रयत्न करा. मळून झाल्यावर शेवटी थोडे तेल लावून झाकून 10 मिनिटे ठेवा.
मळलेल्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करुन घ्या. प्रत्येक केलेला गोळा थोडा दाबून घ्या, म्हणजे थेपला लाटायला सोपा जातो.
चपातीसारखे पण थोडे जाडसर थेपले लाटा. फार पातळ लाटल्यास ते तुटतात. जाडसर लाटावे म्हणजे कोथिंबीरची चव छान राहते.
तवा गरम करून त्यावर लाटून तयार केलेला थेपला ठेवा. दोन्ही बाजूंनी हलके तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
गरमागरम कोथिंबीर थेपले लोणी, दही, लोणचं किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
जास्त कोथिंबीर घातल्यास थेपले अधिक चवदार होतात पीठ मळताना दही घातल्यास थेपले मऊ राहतात. हे थेपले 1 ते 2 दिवस टिकू शकतात.