

राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा अटक पूर्व जामिन पनवेल कोर्टाने फेटाळला
० मंगेश काळोखे हत्या प्रकरणी फिर्यादीमध्ये हत्येस मदत केल्याचा आरोप सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर करण्यात आला आहे.
० घारे आणि भगत यांचा या हत्येत हात आहे, अटक न करता बेल देऊ नये अशी मागणी काळोखे कुटूंबीयां कडून केली जात आहे.
लक्ष्मी आंदेकर च्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
१६ जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी न्यायालयाकडून सुनावणी
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ नाना पेठ मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर निवडणूक लढवणार
अरविंद सावंत, खासदार ठाकरेंची शिवसेना
15 आमदार आणि मंत्र्यामध्ये एक मंत्री नाशिकला पालक मिळू शकत नाही
नाशिकच्या कुंभमेळ्याला गुंड माणूस मिळतो, जामनेर मधून इम्पोर्ट करावा लागला अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच आमचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, यामुळे विरोधकांना मिर्ची झोंबली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टीका केली.
कल्याण डोंबिवलीत महायुतीचा महापौर असेल, तर उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल- खासदार डॉ श्रीकांत शिंदे
विरोधकांनाही विश्वास,केडीएमसीवर महायुतीचीच सत्ता येणार – खासदार शिंदे
बदलापुरात मनसेला मोठा धक्का
मनसेच्या महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
नवी मुंबई शहरामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे गणेश नाईक यांना टोला
अँकर
नवी मुंबई शहरामध्ये अनेक पायाभूत सुविधा नाहीये त्यामुळे नवी मुंबई शहरात विकास करण्याची गरज आहे तसेच या मॉडेल पहा
एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांना राजकीय टोला लगावलेला आहे त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे
कल्याणडोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून तीन जागांची मागणी करूनही एकही जागा देण्यात आली नसल्याने पक्षातील असंतोष उघडपणे समोर आला आहे.
शनीशिंगणापूर रोडवर भीषण अपघात झाला असून टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षामध्ये हा अपघात झालाय. राहुरी शनीशिंगणापूर रोडवरील उंबरे गावात ही घटना घडलीये. यामध्ये भरधाव ट्रॅव्हलरने रिक्षाला उडवलंय. रिक्षामधील चार जणांचा मृत्यू तर दोन ते तीन जण गंभीर जखमी आहेत. यावेळी स्थानिकांनी मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
बीड शहरातील अंकुश नगर भागात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक नाल्याचे काम करणाऱ्या कामगारावर बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आले मात्र त्या गोळ्या लागल्या नसल्याची माहिती आहे यानंतर आरोपीने पाठलाग करत धारदार शस्त्राने वार केले.
या घटनेमध्ये हर्षद उर्फ दादा शिंदे यांची हत्या झाली आहे. आरोपीचे नाव विशाल सुर्यवंशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक रवाना करण्यात आले आहे.
परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं परभणीतील राजकीय समीकरणाचा आढावा येण्यासाठी आलो आहे.काँगेसच्या काळात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आणि दलाल ते पैसे पळवायाचे आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्व पैसे खाली येत आहे निवडणुकीसाठी सात ते आठ दिवस बाकी आहेत,हे मतदान तुमचे आमचे आणि पुढील पीढी घडवण्यासाठी आहे कोण्या उमेदवाराने 1 मतदान मागूनये चार जागेसाठी मतदान मागा कमळाला 50 टक्के पेक्षा जास्त कसे होईल यासाठी प्रयत्न कर परभणी शहराला भाजपाचा महापौर देण्याचे स्वप्न आहे त्यामुळे तुम्ही भाजपला मतदान करून घ्या यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले
नवी मुंबई शहरामध्ये भाजपची सत्ता यावी याच दृष्टीने माजी आमदार संदीप नाईक मैदानात उतरलेले आहेत संदीप नाईक भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर कॉर्नर सभा घ्यायला सुरुवात केली त्यामुळे बेलापूर ऐरोली मतदारसंघात कॉर्नर सभा भाजपकडून आयोजित करण्यात येते नवी मुंबई वाचवण्यासाठी गणेश नाईकांना सत्ता द्या असावा नाईक कडून केला जात आहे
कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय.. कोपरगाव तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि पशु धनासह मानवावर वाढते हल्ले चिंतेचा विषय बनला आहे.. काही दिवसांपूर्वी टाकळी शिवारात बिबट्याने चार वर्षीय चिमुकलीचा जीव घेतला होता.. आता पुन्हा टाकळी शिवारात आणखी एक बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.. मात्र तालुक्यातील इतर बिबट्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे
राज्यातील धनगर समाज ST प्रवर्गातील आरक्षणासाठी एक लाख मेंढ्या आणि घोडे घेऊन 21 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतची बीड जिल्ह्यात देखील तयारी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती धनगर आंदोलक परमेश्वर वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कसेही घुसा पण मुंबईत दिसा असा फतवाच जारी करण्यात आला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी येताना दोन पशुधन घेऊन या असे आवाहन देखील करण्यात आले असल्याने 21 जानेवारी रोजीचे धनगर आरक्षण आंदोलन सरकार आणि मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत..
अफवावर विश्वास ठेवू नका , पॅनल टू पॅनल प्रचार करा, वेगवेगळा प्रचार करू नका, शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचा, अरेरावीची भाषा करू नका, जात जोडूनच मतदारापर्यंत जा, आपापसातील रुसवे फुगवे सोडून द्या, कुणाची नाराजी असेल तर त्यांच्याशी संवाद ठेवा, असं अजित पवारांनी सांगितलंय.
अजित पवारांनी बैठकीत सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन केलंय. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा , आपण केलेलं काम जनतेपर्यंत घेऊन जा, अशा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात. निवडणुकीत कसा प्रचार करायचा यावर अजित पवाराकडून उमेदवारांना मार्गदर्शन कऱण्यात आलंय. येणाऱ्या काही दिवसात सहभाग कसा घ्यायच्या प्रचार कसा करायचा याबद्दल अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र दिलाय
नाशिकच्या येवला शहरात तीन दिवस मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो.मात्र पतंगोत्सवा दर गेल्या काही वर्षा पासून घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होऊ लागल्याने मागिल महिन्यात संक्रांती पुर्वीच काही जण जखमी झाले तर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तसेच पतंग उडवणा-याचा मांजा जप्त करत तो जाळला होता.पोलिस रेझिंग डे सप्ताह निमित्त येवला शहरातून नायलॉन मांजा विरोधात नागरीकांनी त्याचा वापर टाळावा यासाठी जनजागृती रॅली काढण्यात येऊन उपस्थितांना नायलॉन मांजा विरोधात शपथ देण्यात आली.
रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव कोळीवाडा परिसरात वणवा
वणव्यात रस्त्याशेजारी उभी असलेली बोट जळून खाक
बोट जळाल्यामुळे कोळी बांधव मुरलीधर दोडकुलकर यांच मोठ अर्थिक नुकसान
- नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि माजलगाव शहरातील नागरिक उपस्थित होते.
- नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या शिफा बिलाल चाऊस या निवडुण आल्या आहेत.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव लातूरातून पुसले जाईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्षांनी करणे, ही खेदाची बाब आहे. विलासरावांनी या राज्याची सेवा केली आहे. त्यांचे कार्य आमच्यासारख्या नवख्या खासदारांसाठी प्रेरणा देणारे आहे. अमित आणि धीरज देशमुख हे त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. देशमुख साहेबांबद्दल चव्हाण यांनी केलेले विधान खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.
2017 साली दाखल गुन्ह्याची आज सुनावणी...
श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयात तोडफोड प्रकरणात दाखल गुन्ह्याची आज सुनावणी...
शेतकरी पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनासंदर्भात कडू आणि रघुनाथदादा यांच्यावर दाखल करण्यात होता गुन्हा...
अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळे फसल्याप्रकरणी दाखल होता गुन्हा...
दाखल गुन्ह्याच्या खटल्याची आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता...
आजच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी कल्याण पश्चिम परिसरात भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली. जो देईल तुम्हाला नोट, त्याला करू नका वोट असा ठळक संदेश देत या उपक्रमातून मतदारांना प्रलोभनांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
वेंगुर्ला बंदरावर सकाळी व संध्याकाळी मासेमारी नौका दाखल होत असून सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा हे मासे मोठ्या प्रमाणात जाळ्यात मिळून येत आहेत. थंडीचा हंगाम सुरू असल्यामुळे कोळंबी जास्त प्रमाणात जाळ्यात मिळत असल्यामुळे मच्छीमारही आनंदात आहेत. सध्या माशांचा दर सुद्धा कमी असल्यामुळे खवय्यांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशकात भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण कायम
प्रभाग क्रमांक 26 मध्ये अलका अहिरे यांना भाजपकडून माघार घेण्याची सूचना
प्रभाग क्रमांक 26 मधून पुष्पावती पवार यांना भाजपने केले पुरस्कृत उमेदवार
AB फॉर्म वाटपावेळी झालेल्या गोंधळात एक AB फॉर्म अलका अहिरे यांना मिळाल्याने अलका अहिरे यांना कमळ चिन्हं मिळालं, तर पुष्पवती पवार यांचा AB फॉर्म ठरला होता बाद
अलका अहिरे यांनी माघार घेतली नाही तर कारवाईचा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा इशारा
अमरावती महापालिकेत महायुतीच्या युतीची चर्चा आम्हाला या आमंत्रण होतं,काही कारणामुळे आमची युती झाली नाही,ज्या दोन पक्षाची युती झाली त्यांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले, बर झालं आम्ही त्या चिखलातून बाहेर पडलो अशी टीका अभिजीत अडसूळ यांनी भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान वर केली.अमरावती महानगरपालिकेत पूर्ण राजकारणाचा चिखल झाला आहे,भारतीय जनता पक्ष सारखा पक्ष ज्या पक्षाचा पंतप्रधान आहे तो पक्ष एखाद्या छोट्या पक्षासाठी आपल्याला दिलेल्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेण्यासाठी पत्र देतात, यापेक्षा दुसरी कोणतीही लाजिरवाणी गोष्ट होऊ शकत नाही अशी टीका माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केली.निवडणुकीत युती करताना पारदर्शक असायला पाहिजे मात्र या निवडणुकीत कुठे पारदर्शिकता ठेवली नाही.युती करायची सीट वाटप करून घ्यायची आणि एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करायचे राजकारणाचा चिखल करायचा अशी परिस्थिती झाली आहे.त्यामुळे जनतेला देखील विचार करावा लागत आहे की आपण काय करायचं.
राज्यातील निवडणुका 20 दिवस पुढे ढकलण्यात आल्या,निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून येतात,जनतेला हे सगळं कळत आहे अशी देखील सणसणीत टीका निवडणूक आयोगावर केली
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत
जळगाव महापालिका निवडणुकीतील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचा भव्य असा रोड शो पार पडणार आहे
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोड शो ला सुरुवात होणार आहे..
ज्या महाविजय रथांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोड शो मध्ये सहभागी होतील ते रथ या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले आहे..
ज्या मार्गावरून रोड शो पार पडणार आहे त्या मार्गावरील संपूर्ण सुरक्षितेची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे..
रोड शोच्या मार्गावर ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे भव्य असे कट आउट तसेच बॅनर लावण्यात आलेले आहेत
जळगावात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा महायुतीमध्ये ही निवडणूक लढवली जात असून भाजप शिवसेनेचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध झाले आहेत..
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचाराची तोफ धुळ्यात धडकणार
दुपारी दोन वाजता धुळ्यातील कालिका मंदिरा जवळ भव्य दिव्य असे सभेचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेतून विरोधकांवर काय टीका करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून
गेल्यावेळी प्रमाणे यावेळी देखील भाजपने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने भाजपला मित्र पक्षांचेच मोठ आव्हान
माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज करणार शिवसेनेत प्रवेश
२००३- ०४ च्या कुंभमेळ्यावेळी महापौर असलेले दशरथ पाटील आणि २०१५- १६ च्या कुंभमेळ्यावेळी महापौर असलेले अशोक मुर्तडक आज शिवसेनेत प्रवेश करणार
खासदार हेमंत गोडसे यांच्या सोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना
दुपारी बारा वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा
माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूर मध्ये उमेदवार
तर अशोक मुर्तडक देखील लढत आहेत अपक्ष निवडणूक मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं मुर्तडक यांना केलंय पुरस्कृत
अजित पवार यांचे "मिशन पुणे महापालिका"
अजित पवार घेणार आज उमेदवारांची बैठक
दुपारी २ वाजता पुण्यातील सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज अजित पवार घेणार बैठक
आज पुणे शहरातील सर्व प्रभागातील उमेदवारांची अजित पवार घेणार भेट
महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार देणार उमेदवारांना कानमंत्र
प्रचाराची रणनीती, प्रचार सभांचे नियोजन तसेच इतर गोष्टींचे अजित पवार करणार मार्गदर्शन
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणारे अजित पवार पुणे महापालिकेवर सुद्धा करणार लक्ष केंद्रित
समृद्धी महामार्गावर धावंत्या खाजगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने पेट घेतला चालकाच्या सावधतेने बस थांबविण्यात आली व आरडा ओरड करीत बस मधील प्रवाश्याना खाली उतरवण्यात आले.. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.. ही खाजगी बस नागपूर वरून मुंबई च्या दिशेने जात होती.. या आगीत संपूर्ण बस खाक झाली आहे हा अपघात मेहेकर तालुक्यातील शिवणीपिसा गावा नजीक झाला..
नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणूकीसाठी महापालिके तर्फे मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून,मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहरातील उर्दु,मराठी शाळां मधिल विद्यार्थ्यांनी आज सकाळी मानवी साखळी तयार करत मतदार राजा जागा हो. एकच लक्ष मताचा हक्क अशा अनेक घोषणा देत मतदान जनजागृती करत रॅली काढली.महापालिकेच्या प्रवेशद्रवारा पासून,गुळ बाजार,नंदन टॉवर,संविधान चौक,दत्त मंदिर चौक,संगमेश्वर,रावळगाव नाक्या पर्यंत ही जनजागृती मानवी साखळी करत जनजागृती करण्यात आली.
बुलडाणा जिल्हयातील वानखेड येथे श्री जगदंबा देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रोत्सवानिमित्त रथोत्सव, दहीहंडी व भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या मंदिरात पारंपरिक विधी, अभिषेक, दहीहंडी सोहळा व महाप्रसाद वितरण पार पडले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांतून आलेल्या भाविकांनी देवीचे दर्शन घेत श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला.
माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत माजी खासदार सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रायगडच्या लोणेरेमध्ये एका वृध्द महिलेला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागीने चोरल्याची घटना समोर आली आहे. सदर वृद्ध महिला शेतात काम करत असताना तोंडाला स्कार्प बांधलल्या महिलेने दगडाने हल्ला केला नंतर मारहाण करीत दागीने चोरले. वृध्द महिला गंभिर जखमी असून तील माणगाव उपाजिल्हा रुग्णालयात उपचारा करता दाखल करण्यात आले आहे. गोपनीय माहिती, परिसरातील CCTV ची मदत घेत तपासाची सुत्र हलवत आरोपी महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यासाठी रिक्त असलेल्या जागांवर पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी जिल्ह्यातील वसमत कळमनुरी व हिंगोली उपविभागीय कार्यालयात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आहे दरम्यान ही पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून कोणत्याही उमेदवारांनी अफवा व भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जालन्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचाराचा शुभारंभ झालाय.जालना शहर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील प्रचाराचा नारळ फुटला आहे. जालना महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे एकत्र लढत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 50 तर मनसेचे 6 उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज आमदार विक्रम काळे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. जालना महानगरपालिकेवर आमचाच महापौर होणार असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने आपले 37 उमेदवार रिंगणात उतरवले . आज एमआयएमचे प्रमुख खासदार असद ओवेसी यांनी नांदेड मध्ये. दोन जाहीर सभा घेतल्या . यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपाचे स्थानिक आमदार अशोक चव्हाण यांच्यावर जहरी टिका केली.अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे झाले नाहीत, नांदेडचे काय होणार अशी टीका खासदार असद ओवेसी यांनी केली . ज्यांनी तुमचं पालन पोषण केलं , पद दिली इज्जत दिली , त्यांना तुम्ही घरी बसवून पुढे गेले ही तुमची ओळख आहे असं ओवेसी म्हणाले.स्वता उभे राहून सांगता 75 हजार कोटीचा माझ्यावर आरोप आहे , त्याच काय झाल,. अजित पवार तूमच नाव अजित पवार आहे , जर मुसलमनाच नावं असत तर तुम्ही ही 75 वर्ष तुरुंगात असता.हा. फरक आहे जे सत्तेत असतात त्यांचासाठी आणि विरोधात मुस्लिमांसाठी.
भाजपने घेतलेला दुसऱ्याच्या मांडवातील उंट,सत्तांतर झालं तर पहिल्यांदा उडी मारणारा बेडूक अस म्हणत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. धाराशिवमध्ये मूळ भाजप कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात नाही,त्यांच्याबद्दल आमची कोणती तक्रार नाही.भाजप आणि शिवसेनेचे रक्त एक आहे.पण आता विचारात आणि रक्तात खोट आहे म्हणत सावंतांनी राणाजगजीतसिंह पाटलांवर निशाणा साधला.यावेळी भाजपची मूळ लोक आणि आरएसएस यांच्याबाबत आमची तक्रार नसल्याचं सावंत म्हणाले.जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी धाराशिव मधलं राजकीय वातावरण तापला आहे.तानाजी सावंतांच्या टीकेला राणाजगजितसिंह पाटील काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे.
रायगडच्या बागमांडला समुद्र किनाऱ्यावर एक भल मोठ कासव काल संध्याकाळी आढळून आले. या कासवाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर हे कासव जाळ्यात अडकल्या अवस्थेत पडून होते. साधारण 200 किलो वजन असलेल्या या कासवाची जाळ्यातुन सुटका करीत कांदळवन विभाग आणि कासव प्रेमींनी सुटका केली
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात नव्याने सुरू केलेल्या कपड्याच्या दुकानात पाच हजाराची साडी ५९९ रुपयात मिळणार अशी सोशल मीडियावर जाहिरात केल्याने मोठी झुंबड उडाल्याची घटना घडली होती. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सूट जाहीर केल्यामुळे दुकानात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळात तीन महिला बेशुद्ध पडल्या होत्या. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत जवाहरनगर पोलिस ठाण्यात दुकान मालक कृष्णा रघुनाथ देशमुख आणि संजय ललवाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या घटनेची दखल घेतली असून, संबंधित दुकान मालकांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचारात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एका कॉर्नर सभेत बदलापूर व अंबरनाथप्रमाणे उल्हासनगरमध्येही शिवसेनेचा सुफडा साफ होईल, असे वक्तव्य केले.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संयम राखण्याचे आवाहन केले. “महायुती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. युतीतील नेत्यांनी वक्तव्य करताना जबाबदारीने बोलले पाहिजे. आम्हालाही बोलायला बरेच काही आहे, मात्र आम्ही युतीची शिस्त पाळतो,” असे ते म्हणाले.काही ठिकाणी महायुती एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ नेत्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणावरही टीका न करता प्रचार केला आणि त्यातूनच महायुतीला यश मिळाले. त्यामुळे वरिष्ठ काय बोलतात आणि स्थानिक पातळीवर आपण काय करतो याचे भान ठेवणे सर्व नेत्यांसाठी आवश्यक आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.यावेळी शिंदे यांनी संयम आणि समन्वयावर भर दिला.
उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी तिकीट वाटप झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरचा महत्त्वाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध शिवसेना शाखांना भेटी देत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांशी थेट संवाद साधला. उमेदवारांच्या भेटीगाठी घेत पक्षातील स्थितीचा आढावा त्यांनी घेतला.
ज्या प्रभागांमध्ये अंतर्गत वाद, नाराजी किंवा समन्वयाचा अभाव होता, तेथे बंद दरवाजामागे चर्चा करून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उमेदवारांमधील वाद तसेच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून पक्ष संघटन मजबूत ठेवण्यावर शिंदे यांनी भर दिला. या वेळी टीम ओमीचे सर्वेसर्वा ओमी कलानी उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे प्रचार करण्याचा स्पष्ट संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.
राज्यातील एकूण केळी निर्यातीपैकी माढा आणि करमाळा तालुक्यातून सुमारे 65 टक्के निर्यात होते. या भागातील केळीचे उत्पादन कमी करण्यासाठी केळीचे दर पाडण्यात राज्यातील काही साखर कारखानदारांचा हात आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी केला आहे.
टेंभुर्णी येथे केळी उत्पादक शेतकर्यांचा मेळावा झाला.या मेळाव्यात कोकाटे व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हा आरोप केला. या भागात ऊसाला पर्याय म्हणून केळीचे वाढले आहे. परिणामी साखर कारखाने अडचणीत आले आहेत.
चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित 'वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवाला सुरुवात झालीय. खासदार नारायण राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं..या कृषी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली असून, येत्या पाच दिवसांत ७ ते ८ लाख नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी व्यक्त केला. मागील वर्षी साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. प्रदर्शनस्थळी १५ ते २० गुंठ्यांवर प्रत्यक्ष 'लाईव्ह डेमो शेती' उभारण्यात आली आहे.९ जानेवारी पर्यंत हे कृषी प्रदर्शन असणार आहे.
प्रमुख पक्षांची रणनीती आखत मतदारापर्यंत पोचण्यासाठी जोरदार तयारी
भाजप सेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तीन सभा घेणार
सभेतून मुख्यमंत्री युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार..
तर काँग्रेसकडून देखील प्रचाराला गती, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपूर दौऱ्यावर असणार..
दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेत काँग्रेसची भूमिका, स्थानिक प्रश्न आणि प्रचाराची दिशा स्पष्ट करण्याची शक्यता..
तसेच नागपूर पालिकेसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार..
त्यानंतर पालिकेतील 151 उमेदवारांसोबत बैठक घेऊन उमेदवारांशी संवाद साधून मतदारापर्यंत पोहोचण्याचे उपाय आणि संघटनात्मक बळकटी यावर चर्चा होणार..
दहिसरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
▪ MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मधील घटना
▪ विठ्ठलवाडी सोसायटीजवळ शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून युवकांना मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.