Mumbai Landslide News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश

Mumbai Rainfall: पावसाळ्यापूर्वीच बीएमसीकडून डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा आणि स्थलांतरीत होण्याचा इशारा दिला आहे. एस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आदेश दिले आहेत.

Priya More

मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rainfall) दरवर्षी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. या घटना यावर्षी घडू नये त्यासाठी मुंबई महानगर पालिका (BMC) अलर्ट मोडवर आली आहे. पावसाळ्यापूर्वीच बीएमसीकडून डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा आणि स्थलांतरीत होण्याचा इशारा दिला आहे. एस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ आणि २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या आणि डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यादरम्यान मुंबईत मुसळधार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. तसंच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. याचपार्श्वभूमीवर बीएमसी अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे बीएमसीकडून आधीच नागरिकांना सूचना देत स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भागातील धोकादायक इमारतींना आणि झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना आणि नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित परिसरातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे एस विभागाचे सहायक आयुक्त यांच्या वतीने कळविण्यात येत आहे. त्यामुळे बीएमसीकडून दिलेल्या आदेशाचे पालन करत नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतर करावे असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: नांदेड शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

SCROLL FOR NEXT