Shocking : घराबाहेर खेळताना घेऊन गेले, निर्जनस्थळी नेवून तिघांनी आळीपाळीने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार; दिल्ली हादरली

Delhi 8 Years Old Girl Rape News : दिल्लीत ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Shocking : घराबाहेर खेळताना घेऊन गेले, निर्जनस्थळी नेवून तिघांनी आळीपाळीने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार; दिल्ली हादरली
Delhi 8 Years Old Girl Gang Rape Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • दिल्लीत चिमुकलीवरील अत्याचाराची घटना

  • तिन्ही अल्पवयीन आरोपी ताब्यात

  • पोलिसांची तात्काळ कारवाई

  • परिसरात संतापाचे वातावरण

Delhi 8 Years Old Girl Gang Rape Crime News दिल्लीमध्ये एका ८ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही मुलं ही अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत असून परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. तसेच पालकवर्गातून संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षांची मुलगी घरासमोरील अंगणात खेळत असताना १३ वर्षांची तीन मुलं तिच्याजवळ आली. त्यांनी तिला गोड बोलून एका निर्जनस्थळी नेलं. तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिने प्रतिकार करून सुद्धा आरोपींनी तिला सोडले नाही.

Shocking : घराबाहेर खेळताना घेऊन गेले, निर्जनस्थळी नेवून तिघांनी आळीपाळीने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार; दिल्ली हादरली
Crime News : लग्नानंतर बॉयफ्रेंडकडून छळ, तरुणीने नवऱ्याच्या मदतीने काढला काटा; दगड अन् चाकूने हल्ला करत संपवलं

तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र मुलांनी तिला धमकावलं आणि सोडून दिल. मुलीने तिथून पळ काढला आणि आईपाशी जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

Shocking : घराबाहेर खेळताना घेऊन गेले, निर्जनस्थळी नेवून तिघांनी आळीपाळीने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार; दिल्ली हादरली
Leopard Attack : बोरिवलीत बिबट्याची दहशत! पाणी भरायला गेलेल्या पिता पुत्रावर हल्ला; दोघे गंभीर जखमी

मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दिल्ली पोलिसांनी तिन्ही आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी सखोल तपास करत असून आरोपींना कठोर शिक्षा करू. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com