Nawab Malik Money Laundering Case Cyber Crime: Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Cyber Crime: नवाब मलिक यांच्या 'मनी लाँन्ड्रिंग' केसचा वापर, तब्बल २ कोटींना घातला गंडा; मुंबईतील प्रकाराने खळबळ

Nawab Malik Money Laundering Case Cyber Crime: फसवणूक झालेल्यांमध्ये तिघे ज्येष्ठ नागरिक असून बड्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरीस होते. तसेच विलेपार्ले कॉलेज येथील 41 वर्षीय सहाय्यक प्राध्यापकालाही याप्रकरणी गंडा घालण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. २६ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (अजित पवार गट) माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मनी लाँन्ड्रिंग केसचा वापर करत २.७३ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची धमकी पिडीतांना देण्यात आल्या, याबाबत सायबर पोलीस ठाण्यात चौघांनी तक्रारी दाखल केल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या मनी लाँन्ड्रिंग प्रकरणाचा वापर करत तब्बल २.७३ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूकीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, निवृत्त पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत तसेच मुख्यमंत्री यांचे ओएसडी असलेले पोलीस उपायुक्त बाळसिंह राजपूत यांच्या नावांचा वापर करण्यात आला असून याप्रकरणी चौघांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

तब्बल २. ७३ कोटींची सायबर फसवणूक

या तक्रारीनुसार, नवाब मलिक यांच्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची भिती पीडितांना दाखवण्यात आली. तसेच ईडी, सीबीय, एनसी आणि एनसीबी या तपास यंत्रणांच्या कारवाईची भिती, पोलिसांच्या गणवेशात व्हिडिओ कॉल करून, बनावट कोर्टाचे आदेश आणि खोटे अटक वॉरंट दाखवून पिडीतांना फसवण्यात आले. फसवणूक झालेल्यांमध्ये तिघे ज्येष्ठ नागरिक असून बड्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरीस होते. तसेच विलेपार्ले कॉलेज येथील 41 वर्षीय सहाय्यक प्राध्यापकालाही याप्रकरणी गंडा घालण्यात आला आहे.

काय आहे मलिकांचे मनी लाँन्ड्रिंग प्रकरण?

धक्कादायक बाब म्हणजे, बेंगलुरु, गुरुग्राम आणि हैदराबाद येथेही नवाब मलिक यांच्या केसचा वापर करून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्या प्रकरणाचा आणि मुंबईतील प्रकरणांचा काही संबंध आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील जमीन गैरव्यवहाराचे आरोप आहेत. याप्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर तब्बल १ वर्ष ते तुरुंगात होते. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT