Maharashtra Politics : लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम, महाराष्ट्र इतका लाचार कधीच नव्हता; 'सामना'तून महायुतीला चिमटे

Shivsena on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व 1500 रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम, महाराष्ट्र इतका लाचार कधीच नव्हता; 'सामना'तून महायुतीला चिमटे
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV
Published On

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील महिलांसाठी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून लाडकी बहीण योजनेवर भाष्य करण्यात आलंय. महिलांना दरमहा 1500 रुपये देताय. पण सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम, महाराष्ट्र इतका लाचार कधीच नव्हता; 'सामना'तून महायुतीला चिमटे
Vasantrao Chavan : सरपंच ते खासदार, अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे वसंत चव्हाण कोण होते?

सामनाच्या अग्रलेखात काय लिहलंय?

"लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत. प्रेक्षकगृहातील महिलांकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाबी पाकळय़ा उधळून घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता", अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

"लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व 1500 रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे. मुख्यमंत्री मिंधे 1500 रुपये वाटत फिरत आहेत, तर पंतप्रधान ‘लखपती दीदी’ योजनेसाठी काल जळगावात येऊन गेले. हे खरे असले तरी बहिणी–दीदींच्या सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही", असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलंय.

"यवतमाळमधील कार्यक्रमात अजित पवार-फडणवीस यांची भाषणे आटोपली व मुख्यमंत्री मिंधे भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होताच महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. अर्ज भरूनही आम्हाला पैसे मिळाले नाहीत, अशा घोषणा त्या महिला देऊ लागल्या. त्यामुळे मुख्यमंत्री मिंधे यांना भाषण थांबवून त्या महिलांची समजूत काढावी लागली. ‘‘पैसे मिळतील, पैसे मिळतील’’ असे वारंवार सांगावे लागले", असा टोलाही सामनातून लगावण्यात आला.

"महायुतीत सरकारकडे एक लाडका मुलगा आहे व एक लाडकी मुलगी आहे. हा लाडका मुलगाच सध्या ‘वर्षा’ बंगल्यावरून राज्याच्या प्रशासनास धमक्या देत राज्य चालवीत आहे. निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने सगळेच लाडके होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत", असा आरोपही सामना अग्रलेखातून करण्यात आला.

"जालन्याच्या भुऱ्याने ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. भुऱ्याने आपल्या खास शैलीत भाषणात सांगितले की, लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे ‘लाडके लेकरू’ अशी लहान मुलांसाठीही योजना सरकारने सुरू करावी. भुऱ्याने खरे तेच सांगितले. भुऱ्याला डोके आहे. तो डोक्यावर पडलेला नाही हे डोके नसलेल्या सरकारने लक्षात घ्यावे", असा टोला सामना अग्रलेखातून सरकारला हाणला आहे.

लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम, महाराष्ट्र इतका लाचार कधीच नव्हता; 'सामना'तून महायुतीला चिमटे
Vasant Chavan Passes Away: 'एकनिष्ठ, लढवय्या शिलेदार हरपला', वसंत चव्हाण यांच्या निधनाने शरद पवार, अशोक चव्हाण हळहळले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com