Vasantrao Chavan : सरपंच ते खासदार, अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे वसंत चव्हाण कोण होते?

Who is Nanded MP Congress Leader Vasantrao Chavan : नांदेडचे खासदार आणि वसंत चव्हाण यांचं आज निधन झालंय. त्यांच्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेवू या.
वसंत चव्हाण
Vasantrao Chavan Saam Tv
Published On

मुंबई : नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे राजकीय वर्तुळात काहीसं दु:खाचं वातावरण आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार प्रताप चिखलीकरांना धूळ चारत वसंत चव्हाण यांनी विजयाचा गुलाल उधळला होता. वसंत चव्हाण यांच्या मृत्युमुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे.

कोण आहेत वसंत मोरे ?

आपण वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द जाणून घेवू या. चव्हाण यांनी १९७८ मध्येच राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला (Nanded Khasdar Vasantrao Chavan) होता. त्यांनी नायगावमधून निवडणूक लढवत १९७८ मध्ये पहिल्यांदा सरपंच झाले होते. त्यानंतर वसंत चव्हाण २०० साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्याचं समोर आलंय. त्यानंतर लगेच त्यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढे सलग १६ वर्ष चव्हाण विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये कार्यरत होते.

वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

नांदेड जिल्ह्यामध्ये २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाली (Nanded News) होती. त्यानंतर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले होते. नांदेडमध्ये कॉंग्रेसचं वर्चस्व कायम ठेवण्यात वसंत चव्हाण यांची मोठी भूमिका आहे.नायगाव गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून चव्हाण यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केलाय. जनता हायस्कूल आणि अ‍ॅग्रीचे अध्यक्ष म्हणून देखील चव्हाण यांनी काम (Who is Congress Leader Nanded MP) केलंय.

वसंत चव्हाण
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण, उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर

लोकसभा निवडणुकीत दणक्यात विजय

वसंत चव्हाण खासदार होण्याअगोदर महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून देखील निवडून गेले होते. चव्हाण यांनी २०१४ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची मे २०१४ मध्ये विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती देखील करण्यात आली (Maharashtra Politics) होती. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २०२४ मध्ये आता चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे वसंत चव्हाण यांचा वयाच्या ६४ व्या वर्षी मृत्यू झालाय.

वसंत चव्हाण
Vasantrao Kale Sugar Factory News : वसंतराव काळे साखर कारखाना अध्यक्षपदचा कार्यभार घेताच कल्याणराव काळे म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com