Mumbai New Railway Line Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai New Railway Line: मुंबईला मिळणार नवी रेल्वे लाइन; कल्याण-कसारा प्रवास होणार सुसाट; काय आहे प्लान?

Mumbai New Railway Line Kalyan to Kasara: कल्याण ते कसारा या मार्गासाठी नवीन रेल्वे लाइन सुरु केली जाणार आहे. यामुळे मेल एक्सप्रेससाठी नवीन लाइन सुरु होणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनला थांबावे लागणार नाही.

Siddhi Hande

कल्याण-कसारासाठी नवीन रेल्वे मार्ग

मेल एक्सप्रेस, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळी लाइम

६८ किमी लांब असणार मार्ग

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कल्याण-कसारा दरम्यान नवीन रेल्वे लाइन सुरु करण्यात येणार आहे. या नवीन रेल्वे लाइनमुळे प्रवास खूप सोपा आणि जलद होणार आहे. कल्याण ते कसारा नवीन रेल्वे लाइन ६८ किमी लांब असणार आहे.

कल्याण कसारा ट्रेनचा पहिला टप्पा आसागाव-कसारा असणार आहे. हा जवळपास ३५ किमी लांबीचा असणार आहे. या रेल्वे लाइनमुळे कल्याण-कसाऱ्यातील प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

नवीन रेल्वे मार्ग सुरु होणार

कसारा ते खर्डीदरम्यान नवीन रेल्वे मार्ग होणार आहे. हा मार्ग १३.५३ लांब असणार आहे. या मार्गाचे विद्युतीकरण १२ मे रोजी होणार आहे. याला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात होईल. या मर्गामुळे मेल एक्सप्रेस दुसऱ्या मार्गावरुन आणि उपनगरीय लोकल वेगळ्या मार्गावरुन धावतील. त्यामुळे उपनगरीय रेल्वेला जास्त वेळ थांबावे लागणार नाही.

कल्याण-कसारा रेल्वे लाइन ६८ किमी लांब असणार आहे. पहिल्या टप्पा ३५ किमी असून त्यातील १३.५३ किमीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या कामासाठी ७९२.८९ कोटी रुपये खर्च आला आहे. मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाचा हा विस्तार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सर्व रेल्वे, मेल एक्सप्रेस या वेळेत पोहचाव्यात हा आहे.

सध्या या दोन्ही मार्गांवर एकूण १४७ लोकल धावतात. तर ७१ लांब पल्ल्याच्या ट्रेन आहेत.याचसोबत २० मालगाड्या धावतात. दरम्यान, आता कल्याण ते कसारा स्थानकांवर प्रवाशांनी वाढती गर्दी लक्षात घेता मेल एक्सप्रेससाठी वेगळी रेल्वे लाइन सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT