परळी येथे रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
नितीन ढगे असे मृताचे नाव
वरिष्ठांच्या छळाचा संशय व्यक्त
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
जिल्ह्यात संतापाची लाट
योगेश काशीद, बीड
Beed Parali Railway Police Nitin Dhage Sucide News बीडमधील परळी येथील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला त्याचे अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. या घटनेची कसून चौकशी सुरु आहे. नितीन पंडित ढगे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन ढगे (Nitin Dage) हे परळी रेल्वे (Parali Railway ) पोलीस दलात कार्यरत होते. सदर घटना आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यांनी परळी येथील, माधव बाग परिसरात राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलून दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नितीन ढगे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. पोलीस दलातील वाढता ताण आणि अंतर्गत जाच यामुळे एका तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यास पोलिसांना तपासाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतर किंवा सुसाईड नोट मिळाल्यास आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, या घटनेमुळे लोहारा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून चौकशीची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.