Luxurious Train : WiFi-TV ते लग्जरी रुम; 'या' ट्रेनमध्ये मिळतात 5-स्टार हॉटेलसारख्या सुविधा, एकदा तुम्ही प्रवास कराच

Shreya Maskar

लग्जरी ट्रेन

आज आपण भारतातील अशा एका ट्रेनबद्दल जाणून घेणार आहोत, जी पंचतारांकित हॉटेल सारखी आहे. 'महाराजा एक्सप्रेस' असे या ट्रेनचे नाव आहे.

Luxury Train | google

महाराजा एक्सप्रेस

महाराजा एक्सप्रेस भारतातील अनेक मार्गांवरून प्रवास करते. महाराजा एक्सप्रेसचा वापर प्रामुख्याने व्यावसायिक, विदेशी पर्यटक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर करतात.

Luxury Train | google

मुख्य उद्देश काय?

महाराजा एक्सप्रेस जी प्रामुख्याने परदेशी पर्यटक आणि वारसा स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चालवली जाते. ही ट्रेन प्रवाशांना ५-स्टार हॉटेलसारख्या सुविधा, शाही आदरातिथ्य आणि भारतातील ऐतिहासिक वारसा व संस्कृतीचा अनुभव, एकाच प्रवासात देते.

Luxury Train | google

भव्य राजवाडे

महाराजा एक्सप्रेसचा अंतर्गत भाग भारतीय राजवाड्यांच्या भव्यतेपासून प्रेरित आहे. ज्यात भव्य सजावट, आकर्षक फर्निचर आणि उत्कृष्ट डिझाइन आहे. ट्रेनचा प्रत्येक डबा अत्यंत आलिशान पद्धतीने तयार करण्यात आला आहे.

Luxury Train | google

आलिशान सुविधा

'महाराजाज एक्सप्रेस' मध्ये लग्जरी स्नानगृहे, वाय-फाय, लग्जरी रुम, टीव्ही आणि २४ तास उपलब्ध असणारी बटलर सेवा उपलब्ध आहे. वैभवशाली केबिन्सचा समावेश आहे. सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था आणि प्रवासादरम्यान मदतीसाठी उपलब्ध असलेले पॅरामेडिक्स (वैद्यकीय सहाय्यक) अशा सुविधाही उपलब्ध आहेत.

Luxury Train | google

लग्जरी रेस्टॉरंट्स

दोन बार/लाउंज कार्स (राजा क्लब आणि सफारी बार) आहेत. तसेच दोन उत्कृष्ट दर्जाची रेस्टॉरंट्स (मयूर महल आणि रंग महल) देखील आहेत. जिथे स्वादिष्ट भारतीय आणि विदेशी खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळते.

Luxury Train | google

प्रवासी मार्ग

महाराजा एक्सप्रेस प्रामुख्याने दिल्ली, आग्रा, जयपूर, रणथंबोर, बिकानेर, जोधपूर, उदयपूर आणि मुंबई यांच्या दरम्यान धावते.

Luxury Train | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Luxury Train | google

NEXT : मनाला भुरळ घालणारे साताऱ्यातील हिल स्टेशन, कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडगार हवा

Summer Vacation In Satara | yandex
येथे क्लिक करा...