India’s Largest Railway Station: भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

भारतातील रेल्वे स्टेशनं

भारतात अनेक रेल्वे स्टेशन आहे. मुंबईतील लोकं तर दररोज एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉमवर प्रवास करतात. मात्र तुम्हाला देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन माहितीये का?

Howrah Junction facts

अनेक कथा

रेल्वे प्रवासासोबत अनेक लोकांच्या कथा आणि स्वप्नं जोडलेली असतात. प्रत्येक प्रवासी आपली एक वेगळी कहाणी घेऊन प्रवास करतात. या प्रवासात भावना, संघर्ष आणि आशा सगळं काही सामावलेलं असतं.

Howrah Junction facts

सर्वात मोठं रेल्वे स्टेशन

भारतामधील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन म्हणजे हावडा जंक्शन आहे. हे स्टेशन आपल्या भव्य रचनेमुळे आणि महत्त्वामुळे ओळखलं जातं. पूर्व भारतातील वाहतुकीसाठी हे एक प्रमुख केंद्र आहे.

busiest railway station India

हावडा जंक्शन

हावडा जंक्शन हे भारतातील सर्वात बिझी रेल्वे स्थानकांपैकी एक मानलं जातं. दररोज याठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. यामुळे इथली हालचाल कायमच गजबजलेली असते.

Howrah station platforms

२३ प्लॅटफॉर्म

या स्टेशनवर एकूण २३ प्लॅटफॉर्म आणि २५ पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर रेल्वेची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. म्हणूनच एकाच वेळी अनेक गाड्या सहजपणे हाताळल्या जातात.

Indian railways network

हावडा जंक्शनची स्थापना

हावडा जंक्शनची स्थापना १८५४ मध्ये झाली होती. १५ ऑगस्ट १८५४ रोजी इथून पूर्व भारतातील पहिली प्रवासी ट्रेन धावली. हा दिवस भारतीय रेल्वे इतिहासात खूप महत्त्वाचा मानला जातो.

biggest station platforms India

लहान-मोठ्या गाड्या

दररोज सुमारे ६०० लहान-मोठ्या गाड्या या स्टेशनमधून जातात. सुमारे ७० एकर परिसरात पसरलेलं हे स्टेशन अत्यंत विशाल आहे. भारताची पहिली राजधानी एक्सप्रेस देखील याच ठिकाणाहून सुरू झाली होती.

railway travel India

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा