Uday Samant News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईकरांसाठी BEST निर्णय! '२०२७ पर्यंत 'बेस्ट उपक्रमात' सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक...' मंत्री उदय सामंत यांची माहिती

Mumbai BEST Bases: मुंबईकरांच्या सेवेसाठी वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस लवकरच दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बस ताफा हा २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्यात येणार आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Winter Session 2023:

मुंबईकरांच्या सेवेसाठी वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस लवकरच दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते.

काय म्हणाले उदय सामंत?

बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३२०० बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ३५ दुमजली व ४५ एकमजली अशा एकूण ८० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत... अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

मुंबईतील वाढत्या वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याकरिता बेस्ट उपक्रमामार्फत महानगरपालिकेच्या सहकार्याने ९ जुलै, २०१९ पासून प्रवास भाड्याचे सुसूत्रीकरण करण्यात आले. प्रदूषण कमी करणे व खाजगी वाहनांचा वापर कमी करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या सर्वसाधारण बस सेवेवर पूर्वी आकारण्यात येत असलेले कमीत कमी प्रवासभाडे रु. ८ वरुन रु. ५/- व वातानुकूलित बस सेवांकरिता आकारण्यात येत असलेले कमीत कमी प्रवासभाडे रु. २० वरुन रु. ६ करण्यात आले आहे.. असे उदय सामंत म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, सद्य:स्थितीत बेस्ट उपक्रमाचे मासिक उत्पन्न रु. ६० कोटी असून, मासिक खर्च रु. २४०/- कोटी इतका आहे. रु. १८० कोटी इतका मासिक तोट्याची रक्कम बेस्ट उपक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC Mumbai) अनुदान स्वरुपात प्राप्त होत आहे, असेही मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

Railway Jobs: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

Kartik Purnima 2024: तीन विशेष योगात साजरी होणार कार्तिक पौर्णिमा, या उपायांनी होतील सर्व मनोकामना पूर्ण

SCROLL FOR NEXT