मुंबई बेस्ट बसचा नवा उपक्रम; प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

रेल्वे प्रवास बंद झाल्याने अनेक मुंबईकर नागरिक बेस्टने प्रवास करत आहेत. मुंबईतील बस स्थानकावर अगोदर पत्र्याचे अथवा लोखंडाचे फलक असल्याने ते फलक काही दिवसातच खराब होत आहेत.
मुंबई बेस्ट बसचा नवा उपक्रम; प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
मुंबई बेस्ट बसचा नवा उपक्रम; प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर Saam Tv
Published On

मुंबईकरांसाठी लोकल बंद (Mumbai Local) असल्याने मुंबईकर नागरिक बेस्टने प्रवास (Best ) करतात बेस्टला अनेक अडथळे आले तरीदेखील बेस्टचा प्रवास अजून पर्यंत थांबलेला नाही. येणारी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बेस्ट मुंबईमध्ये (Mumbai Best Bus) वेगवेगळे प्रयोग करत असते याच पद्धतीने मुंबईमध्ये जवळपास 346 बस स्थानकांवर ती एलईडी लावून आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

बस प्रवाशांना बस मार्ग क्रमांक आणि गंतव्यस्थानाची माहिती देण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने मुंबई शहर आणि उपनगरातील शंभर ठिकाणी बस थांबे , तसेच बस चौक यांच्या ठिकाणी आधुनिक अशा एलईडी तंत्रज्ञानाचा वापर करून गंतव्यस्थानदर्शक एलईडी फलक लावले आहेत . मुंबई शहर मुंबई उपनगर यामध्ये 346 बस स्थानकांवर असे दिशादर्शक एलईडी फलक लावण्यात येणार आहेत.

मुंबई बेस्ट बसचा नवा उपक्रम; प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
पत्नीचा पाठलाग करणाऱ्या पती विरोधाक गुन्हा दाखल

नेवी नगर, आरसी चर्च, मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच मुंबई दक्षिण मधील शिव बस स्थानक, माहीम बस स्थानक, वांद्रे, वांद्रे कॉलनी इतर स्थानकांचा समावेश आहे. केवळ मुंबई मध्येच असे एलईडी लावण्यात येणार नसून मुंबई उपनगरात तसेच नवी मुंबईमध्ये बेस्टचे मार्ग आहेत त्याठिकाणी देखील हे एलईडी लावण्यात येतील यामुळे प्रवाशांना बसची माहिती मिळेल.

रेल्वे प्रवास बंद झाल्याने अनेक मुंबईकर नागरिक बेस्टने प्रवास करत आहेत. मुंबईतील बस स्थानकावर अगोदर पत्र्याचे अथवा लोखंडाचे फलक असल्याने ते फलक काही दिवसातच खराब होत आहेत. त्यावर ती रंग लावण्याचं कामासाठी देखील कर्मचारी लागतात आणि हे शक्य नसल्याने बेस्टने वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहिले त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 100 बस स्थानकावर एलईडी लावण्यात आले असून येत्या काळात 346 बसस्थानकांवर एलईडी लावण्यात येतील. याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

मुंबईत लोकलचा ज्याप्रमाणे मुंबईमध्ये इतिहास आहे त्याचप्रमाणे मुंबईत बेस्टचा देखील तसाच इतिहास आहे. मुंबई उपनगरात मुंबई शहरात आणि आजूबाजूच्या काही भागांमध्ये कानाकोपऱ्यात बेस्टचे थांबे असून यामध्ये वातानुकूलित बस, साध्या बस अशा पद्धतीने समावेश असतो. ज्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याचप्रमाणे बेस्टचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असून ज्या नवीन पद्धती अवलंबल्या जातात त्याचा फायदा नागरिकांनी जरूर करून घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com