प्रमोद जगताप, दिल्ली| ता. १४ डिसेंबर २०२३
संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र- सरकारवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले संजय राऊत?
"या देशात सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब आहे. देशाची सीमा, सीमावर्ती राज्य, लोक आणि काल पार्लमेंटवर हल्ला झाला. सरकारची आता वाचा गेली आहे..." असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. तसेच "सरकार मुक आणि बधीर झालं आहे, ते निवडणूक प्रचार, शपथविधी यामध्येच व्यस्त आहे. आता जनतेला समजल असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभे आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
अराजकाची सुरूवात..
"ज्या तरुणांना पकडलं त्यांचा मार्ग चुकीचा होता पण त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या. त्यांना वडे तळायला देखील कुठ जागा नाही. त्यातील एक मुलगी PHD करत आहे तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं..." असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. तसेच "ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. तरुणांकडून झालेला अतिरेक देशासाठी घातक आहे," असेही राऊत म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवी संसद भवन असुरक्षित...
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नवी संसद भवन सुरक्षित वाटत नसल्याचाही आरोप केला. "नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित जुनी संसद मात्र अधिक सुरक्षित होती. संसदेत जाताना एक फिल यावा लागतो तो तिथं येत नाही. मला जुन्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रसाद, नेहरू बसलेले दिसत होते इथे काहीच दिसत नाही..." असे ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.