Dharashiv News: मोठी बातमी! देवस्थानच्या नावावर 588 हेक्टरवर शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

शासनाला फसवण्याचा प्रकार करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कार्यवाही करु असा इशारा प्रशासनाने शेतक-यांना दिला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

धाराशिव जिल्ह्यात देवस्थानच्या (devasthan) नावावर असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पिक विमा (crop insurance) उतरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. धाराशिव जिल्ह्यात 588 हेक्टरवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा पिक विमा उतरवला आहे. (Maharashtra News)

इनामी जमीन असेल देवस्थानची जमीन असेल या जमिनी वरती नियमानुसार येत नसताना देखील शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला. धाराशिव जिल्ह्यातील तडवळा सांजा या गावात असणाऱ्या देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर हा पिक विमा उतरवला गेला.

Crop Insurance
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

या संदर्भात जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांच्याकडे लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आता या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे अर्ज नामंजूर केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणीही अशा प्रकारे शासनाला फसवण्याचा प्रकार करू नये. अन्यथा त्यांच्यावर खडक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Crop Insurance
Shirdi Sai Darshan : भाविकांनाे! साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी 'ही' गाेष्ट लक्षात ठेवा, वाचा उच्च न्यायालयाचा आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com