West Bengal chimney explosion
West Bengal chimney explosion Saam TV

West Bengal News: वीटभट्टीत भीषण स्फोट; मजुरांच्या अंगावर चिमणी कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू, ३० जखमी

West Bengal Chimney Collapsed: पश्चिम बंगालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी (१३ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
Published on

West Bengal Chimney Collapsed

पश्चिम बंगालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी (१३ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळं चिमणी कोसळल्याने ३० हून अधिक मजूर मलब्याखाली दबले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

West Bengal chimney explosion
Parliament Attack: संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल; आरोपींनी प्लान कसा रचला? चौकशीत धक्कादायक माहिती

त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. वीटभट्टीची स्टोव्ह पेटवताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेत ४ मजुरांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात एका वीटभट्टीवर ६० मजूर काम करीत होते. बुधवारी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मजुरांनी वीटभट्टीची चिमणी पेटवायची होती.

दरम्यान, काही मजूर चिमणी पेटवण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक भीषण स्फोट झाला आणि ६० फूट उंचीची चिमणी धाडकन जमीनदोस्त झाली. या घटनेत चिमणीच्या मलब्याखाली मजूर दबले गेले.

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर ४ मजुरांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या घटनेत ३० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

West Bengal chimney explosion
Bus Accident: धावत्या बसमध्ये चालकाला फिट, दुचाकीस्वारांना ५० फूट फरफटत नेलं; थरकाप उडवणारी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com